व्यवसाय करावा का……?

          व्यवसाय करावा का……?

आज बहुतांशी लोकांना असे वाटते की एक मोठया पगाराची नोकरी असावी, कारण साधारण ८ तासाच्या नोकरीमध्ये एक फिक्स पगार मिळत असतो आणी रिस्क पण कमी असते, पण एक तात्विक विचार केला तर ज्या ठिकाणी आपण नोकरी करत असतो त्या व्यवसायाचा मालक स्वतः च्या जिद्दीने आणी आत्मविश्वासाने व्यवसाय चालवत असतो आणी आपण मात्र तिथे नोकरी करत असतो.

           तुमच्याकडे जर जिद्द आणी आत्मविश्वास असेल तर स्वतःचा व्यवसाय चालू करून एक अनोखे विश्व तुम्ही निर्माण करू शकता. पण एक लक्षात असू द्या व्यवसाय करणे हि गोष्ट सोपी नाही त्यासाठी मनाची तयारी हवी, मेहनत करण्याची इच्छा हवी आणि सतत व्यवसाय वाढीसाठी धडपड करण्याची तयारी हवी.

          आज बरेचशे युवक सुशिक्षित आहेत पण नोकरी मिळत नसल्याने घरी बसून आहेत. आज बरेचशे युवक आहेत त्यांना व्यवसाय चालू करण्याची तीव्र इच्छा आहे पण कोणता व्यवसाय चालू करायचा किंवा व्यवसाय चालू कसा करायचा आणि व्यवसायासाठी पैसा कोठून  उभा करायचा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे हे युवक घरीच बसून आहेत. परिणामी आजची तरुण पिढी निराशेपोटी चुकीच्या मार्गाला जात आहे. नैराश्य आणि कमी झालेला आत्मविश्वास याच्यामुळे हि पिढी गुन्हेगारी व आत्महत्या अशा प्रवृत्तीकडे वळू लागली आहे.

           आजचे बरेचशे पालक व्यवसायातील धोक्याचा आणि तोट्यांचा विचार करून मुलांना मोठेपणी चांगले शिक्षण घेऊन एक मोठया पगाराची नोकरी मिळवण्यासाठी आग्रही असतात पण तो आपला मुलगा किंवा मुलगी एक बिझनेसमन किंवा बिझनेसवूमन होईल यासाठी अजिबात प्रयत्न नाही करत.

            पालक आपल्या अपूर्ण इच्छा आकांक्षा मुलावर लादतात आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी कडे बोट दाखवतात. आज समाजामध्ये नोकरीला खूप प्रतिष्ठा आहे, आमचा मुलगा अमुक ठिकाणी कामाला आहे, आमच्या मुलाला एवढा पगार आहे असे बरेच पालक सांगत असतात, पण असे काही मोजकेच पालक सांगत असतात कि जे ज्या क्षेत्रामध्ये आपल्या पाल्याने शिक्षण प्राप्त केले आहे त्या क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याच्या उद्धेशाने मुलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देतात. फारच कमी असे पालक असतात की, जे अंबानी, टाटा, किर्लोस्कर, मित्तल, बजाज व डी. एस. कुलकर्णी यांचे उदाहरण देऊन व्यवसायामध्ये मुलांचे मन घट्ट करतात.

        मी काहीतरी नवीन करणार हे ध्येय असेल आणि  व्यवसायामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींना सामोरे जाण्याची हिम्मत असेल तरच एक पाउल पुढे टाकावे. ज्यांना कुणाच्या हाताखाली काम करण्याची इच्छा नसते पण कष्ट करण्याची अपर इच्छाशक्क्ती असते त्यांनी व्यवसायामध्ये आपल नशीब नक्की आजमाव.

         मित्रहो आव्हान स्वीकारण्याची आणी संकटे पचवण्याची ज्यांच्यामध्ये ताकद असते ती माणसे उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःची  नवी ओळख निर्माण करतात. अशी ओळख नोकरी मध्ये कधीच मिळणार नाही. व्यवसायामध्ये जिद्दीने यशस्वी झालात तर अमर्याद पैसा तुमचाच असतो आणि प्रतिष्ठा मिळते ती बहुतेक तीस-चाळीस वर्षाच्या नोकरीमध्ये कधीच मिळणार नाही.

         ज्यांना घरची पार्श्वभूमी हि पिढीजात व्यवसाय करण्याची असते त्यांना मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे व्यवसायाचे धडे लहानपणापासूनच मिळत असतात. पण ज्यांच्या घरची पार्श्वभूमी हि पिढीजात व्यवसाय करण्याची नसते त्यांनी व्यवसायाचे योग्य ते प्रशिक्षण आणि नियोजन करूनच व्यवसायाला सुरुवात करावी.

        व्यवसाय सुरु करताना त्या व्यवसायाचे सखोल ज्ञान असणे खूप गरजेचे आहे जर आपल्याला एखाद्या व्यवसायाची सखोल माहिती नसेल तर संपूर्ण माहिती गोळा करूनच योग्य नियोजन करावे. तसेच तुम्ही करत असलेल्या व्यवसायाची तुम्हाला आवड पाहिजे जर तुम्हाला आवडच नसेल तर कशातच रस राहणार नाही.

        व्यवसायामध्ये वेळेचे बंधन नसते अगदी सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्हाला व्यवसायात मेहनत करावी लागू शकते, उदाहरणासाठी बघायला गेले तर स्वीट चे दुकान, हे दुकान सकाळी सात वाजता उघडते पण स्वीट विकणारा दुकानदार सकाळी पाच वाजल्यापासून त्याच्या दुकानाच्या तयारीला लागतो आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हे दुकान चालूच असते म्हणजे हा दुकानदार फक्त सहा तास झोपतो आणि अठरा तास व्यवसायामध्ये ड्यूटी करत असतो सांगायचे झाले तर व्यवसायामध्ये जेवढा वेळ द्याल तेवढा कमीच आहे. तुमच्या पंखामध्ये जेवढे बळ असेल तेवढा उंच तुम्ही तुमचा बिझनेस नेऊ शकता.

      मित्रहो व्यवसाय करायचा कि नोकरी हा निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागू द्या पण संपूर्ण विचार करूनच योग्य तो व्यवसाय चालू करा पण एकदा घेतलेल्या निर्णयाशी ठाम रहा आणि त्या निर्णयाशी ठाम राहिलात तर उद्योजक म्हणून तुमचे  नाव प्रत्येकाच्या तोंडावर असेल.

December 12, 2016

1 responses on "व्यवसाय करावा का......?"

  1. Mama pan kahi udyog karnyachi echya aahe… Pan maza pan vichlit note ..mi ata Nagpur LA job karto….hospital madhe

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »