• No products in the cart.

व्यवसाय ब्रँड कसा तयार करायचा?

How To Create A Brand –
व्यवसाय ब्रँड

“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा

व्यवसाय ब्रँड

तुम्हाला तुमच्या व्यावसायिक ब्रँड बनवायचा असेल तर, सर्वात आधी तुम्हाला व्यावसायिक ब्रँड म्हणजे काय असतो, ते कळायला हवे.
व्यावसायिक ब्रँड त्यालाच इंग्रजीमध्ये बिजनेस ब्रँड (Business Brand) असे म्हणतात.
आज आपण जाणून घेऊया व्यावसायिक दर्जा (ब्रँड) कसा बनवायचा आणि व्यावसायिक ब्रँड असल्याचे काय फायदे आहेत.

ब्रँडिंग, या परिभाषानुसार हि एक विपणन पद्धती आहे. विपणन म्हणजे मार्केटिंग.  कंपनीच नाव, कंपनी चे प्रतीक (symbol) किंवा डिझाइन, जी कंपनीशी संबंधित म्हणून सहज ओळखता येते. हे उत्पादन ओळखण्यात आणि इतर उत्पादनांमधून आणि सेवांमध्ये आपल्या व्यवसायाला वेगळे करण्यात मदत करते.

ब्रँडिंग का म्हणून महत्त्वपूर्ण आहे?”

कारण यामुळेच ग्राहकांवर स्मरणीय छाप उमटते, परंतु हे आपल्या ग्राहकांकडून आणि ग्राहकांना आपल्या कंपनीकडून काय अपेक्षित आहे, हे जाणून घेण्यास मदत मिळते. प्रतिस्पर्ध्यांपासून स्वत:ला वेगळे करण्याचा आणि आपण काय ऑफर करता हे स्पष्ट करण्याचा हा एक मार्ग आहे, ज्यामुळे ग्राहकाला अधिक चांगली उत्पादनाची निवड करता येते. आपला व्यवसाय ब्रँड हा तुम्ही एक व्यवसाय म्हणून कोण आहात हे दर्शवते.

ब्रँडिंग का महत्वाचे आहे?

१) ब्रँडिंग तुमच्या उद्योगाची ओळख निर्माण करते.
२) ब्रँडिंगमुळे व्यवसाय मूल्य (Business Value) वाढते.
३) ब्रँडिंग नवीन ग्राहक निर्माण करते.
४) ब्रँडिंग बाजारपेठेत तुमच्या व्यवसायाचा विश्वास निर्माण करते.

खालील दिलेल्या ८ टिपा तुम्हाला एक ब्रँड तयार करण्यास मार्गदर्शक ठरलेलंच.(8 Business Branding Tips)

१. पारदर्शक व्हा (Be Transparent)

तुम्ही एक व्यवसायिक आहात आणि तुम्ही आज व्यवसायिक म्हणून कोण आहात, हे लोकांना माहिती नसेल तर, तुम्ही यशस्वी नसल्याचे समजावे. म्हणूनच, एखादा असा ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न करा, जो आपल्या वास्तविक मूल्यांचे प्रतिनिधित्व करेल. ज्याचा आपल्याला प्रतिनिधित्व करण्यास अभिमान वाटेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रात पारदर्शक होण्याची गरज आहे. आणि तुम्ही जो व्यावसायिक दर्जा(ब्रँड) तयार करणार आहात. त्यासाठी तुम्ही किती प्रामाणिक आहे यावर अवलंबून असते.

२. ग्राहकांची गरज लक्षात घ्या. (Consider customer needs)

लक्षात ठेवा की, तुम्हाला तुमच्या ग्राहकांची काय गरज आहे. हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या गरजे व्यतिरिक्त तुम्ही उत्पादन बाजारात आणलं तर, ते तुमच्या व्यावसायिक दर्जाला व व्यावसायिक उत्पन्नाला धोका निर्माण करणारच. म्हणून आधी मार्केट रिसर्च करणे गरजेचे आहे. लोकांच्या गरजा तुम्हाला नाही, कळल्या तर तुम्ही तुमचा ब्रँड तयार करण्यास अयशस्वी असाल.

३. यादीतील सदस्यांना नियमितपणे माहिती पाठवा.(Send Information Regularly to List Members)

आपण आपल्या ग्राहकांच्या संपर्कात आहे, याची खात्री करण्याचा एक मार्ग म्हणजे, आपण नियमितपणे तुमच्या यादीतील ग्राहकांना ई-मेल,व्हाटसअप मेसेज किंवा टेक्स्ट मेसेज पाठवत आहात हे सुनिश्चित करणे.  तुम्ही तुमच्या वेबसाईट वर नियमित ग्राहकांना आवश्यक माहिती पुरवावी. त्यासाठी तुम्ही ब्लॉग चा आधार घेऊ शकता.

४. जाहिरातींसाठी पैसे द्या (Pay for ads)

विनामूल्य विपणनाचे (free marketing) दिवस जवळपास संपले आहेत. आपण विनामूल्य सामग्रीची विपणन बाजारपेठत करू शकता, परंतु यास बराच वेळ लागतो. आपल्या वस्तू वेगवान गतीने बाजारात विकायच्या असल्यास, विपणनावर थोडे पैसे खर्च करा. खासकरुन फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर या प्लॅटफॉर्मवर या पद्धतीचे विपणन तुमच्या व्यावसायिक ब्रँडला प्रचलित होण्यास मदत करतो.

५ . तुमची व्यावसायिक वेबसाईट असेल, तर त्यावर ब्लॉग पोस्ट करा.(If you have a business website, post a blog on it)

तुम्ही एक व्यावसायिक मार्गदर्शक असाल तर, तुमच्या उद्योगाची लोकांवर छाप पाडण्यासाठी वेबसाईट वर ब्लॉग्स लिहू शकता. जेव्हा आपण ब्लॉग पोस्ट करता. तेव्हा हे दर्शविते की, तुम्ही तुमच्या क्षेत्रात एक तज्ञ आहात, कारण आपण आपल्या ग्राहकांबद्दल काळजी घेत असल्याचे त्यातून कळून येते. तसेच हे गूगल सर्च इंजिनला देखील माहिती मिळते की, तुमची एक अधिकृत वेबसाइट आहे.

६. मोबाईल-फ्रेंडली वेबसाइट असणे गरजेचे आहे.(Mobile-Friendly Website)

आजकाल मोबाइल हा खूप चलनात आलेला आहे. वेबसाईटवर लोकांची वर्दळ ही मोबाइलवरून जास्त प्रमाणात आहे. त्यासाठी आपली वेबसाईट ही मोबाईल-फ्रेंडली करणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक ब्रॅण्डिंगला एक तीव्र गतीने चालना मिळेल.
त्यासाठी तुम्हाला प्रथम वेबसाईट मोबाइलसाठी डिझाइन करणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचे मोबाईल धारक ग्राहक तुमच्या पासून तुटणार नाही.

७. आपल्या ग्राहकांना सर्वाधिक पसंत असलेला सोशल मीडिया वापरा.(Use the Social Media That Your customer Likes Most)

तुम्हाला तुमच्या व्यावसायिक ब्रँड सर्वत्र करण्यासाठी इच्छा असल्यास, आपले ग्राहक सर्वाधिक वापरत असलेले व्यासपीठ वापरा. तुम्ही जगासोबत चालत नसाल तर, तुम्ही उद्योगात कधीही यशस्वी होणार नाहीत. म्हणून लोक जास्त वापरत असलेल सोशल मीडिया यावर ग्राहकांसोबत जुळून राहा. हिंदीमधली फेमस म्हण तुम्ही ऐकली असेलच  जो दीखता है। वही बिकता है।”

८. लाइव्ह इव्हेंटमध्ये उपस्थित रहा. (Attend live events.)

तुमच्या उद्योगाचा दर्जा वाढवण्यासाठी तुम्हाला लाइव्ह इव्हेंटमध्ये उपस्थित राहणे खूप गरजेचे आहे. ऑनलाईन इव्हेंटसाठी तुम्ही थेट वेबिनार (webinar) किंवा यू ट्यूब (you tube) चा वापर करू शकता.  किंवा वैयक्तिक इव्हेंटसाठी तुम्ही सेमिनार आणि कार्यशाळेसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करू शकता.

छोट्या व्यवसायांसाठी असो किंवा मोठ्या कंपन्यांसाठीही ब्रँडिंग हे खूप महत्वाचे आहे. आपल्याकडे मर्यादित बजेट असल्यास, स्मार्ट ब्रँडिंग हे आपण तयार करू शकणारे सर्वात स्वस्त व्यवसाय साधन आहे. अशी अनेक क्षेत्रे आहेत, जी जाहिराती, ग्राहक सेवा, प्रचारात्मक माल, व्यावसायिक प्रतिष्ठा आणि लोगो(logo) यासह एक ब्रांड विकसित करण्यासाठी वापरली जातात.  हे सर्व घटक एकत्रितपणे एक अद्वितीय आणि (आशेने) लक्ष वेधून घेणारे व्यावसायिक प्रोफाइल तयार करण्यासाठी कार्य करतात.

वरील दिलेल्या माहितीचे तात्पर्य असे की, आपला व्यवसाय एक ब्रँड असण्याने ग्राहकांमध्ये उद्योगातील तज्ज्ञ असण्याची भावना निर्माण होते, (जे की, तुम्ही असणारच) आणि लोकांना आपल्या कंपनीवर, त्याच्याकडून देण्यात येणाऱ्या उत्पादनांवर आणि सेवांवर विश्वास ठेवता येतो. तसेच तुमच्या व्यवसायाची एक लोगोची(logo) रचना करणे आवश्यक आहे. सहज लक्षात राहू शकेल, ज्याने एखाद्या व्यक्तीवर पहिल्या दृष्टीक्षेपात छाप पाडेल असा लोगो(logo) बनवावा.

आशा करतो की, वरील दिलेल्या माहितीमुळे तुम्हाला तुमचा ब्रँड तयार करायला मदत मिळेलच. तुमच्या उद्योजकतेच्या वाटचालीसाठी चावडी परिवाराकडून हार्दिक शुभेछ्या.                                                                                                                                                                            – सागर राहुत

      “व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

0 responses on "व्यवसाय ब्रँड कसा तयार करायचा?"

Leave a Message

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.