कोल्ड स्टोरेज आणि फळ प्रक्रिया उद्योगासाठी शासकीय योजना (भाग ४ )

अन्न प्रक्रिया उद्योग ज्याच्याकडे भारताने मागील दशकापासून विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे अजूनही या उद्योगाचा भारतात विकास झालेला नाही. त्यामुळे ह्या उद्योगामध्ये प्रचंड वाव आहे. या पदार्थांवर प्रक्रिया करून विविध प्रकारचे पदार्थ निर्माण करता येतात. या पदार्थांना प्रचंड मागणी असतेच मात्र मूळ फळ किंवा शेतीपदार्थापेक्षा प्रक्रिया करून मुल्यवर्धन केलेल्या पदार्थांचे आर्थिक मूल्यही कैक पटीने वाढते. त्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्नप्रक्रिया उद्योगअन्नप्रक्रिया म्हणजे अन्नपदार्थांवर प्रक्रिया करून विविध पदार्थांची निर्मिती करणे. या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारचे पदार्थ निर्माण केले जातात. यामध्ये विविध प्रकारची पेये, चूर्ण आणि विविध प्रकारचे ठोस पदार्थ बनवता येतात.
दुग्धव्यवसाय, प्रोसेस केलेले पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स. धान्यापासूनचे पदार्थ, मसाले, जाम, जेली, मीठ, पॅकेज फूड, इन्स्टंट फूड, लोणचे, मुरंबा, आंब्याचे विविध पदार्थ यांसारखे कितीतरी व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी उपलब्ध आहे. अजून यामध्ये फळे, भाज्या, चिकन, मटन, दूध, चॉकलेट्स, सोयाचे पदार्थ, मिनरल वॉटर उद्योग यांचाही समावेश होतो. या इंडस्ट्रीसाठी लागणारा कच्चा माल भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचबरोबर मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रसामग्री या सार्‍या गोष्टी आपल्यासाठी व्यवसायासाठी अनुकूल आहेत. आपणाला निर्यातीसाठी पण खूप संधी आहेत. अगदी लहान प्रमाणापासून सुरु करून कितीही मोठ्या प्रमाणापर्यंत हा उद्योग वाढवता . विविध प्रकारची उत्पादने एकत्र सुद्धा . चावडी मध्ये उत्तम प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध आहे.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.
हा उद्योग उभारणीसाठी शासनातर्फे विविध प्रोत्साहनपर अनुदान योजना राबविल्या जातात…त्यातील महत्वाचा घटक म्हणजे कोल्ड स्टोरेज ,तसेच प्रक्रिया प्रकल्प सुरु करण्यासाठी लागणाऱ्या मशिनरी यासाठी च्या योजना खाली थोडक्यात दिल्या आहेत.
agbobase magazine | chawadi

शितगृह (नवीन/विस्तारीकरण/आधुनिकीकरण)

 

नवीन शितगृह युनिट प्रकार १ (एकसारख्या तापमानात राहणाऱ्या उत्पादनासाठी )

(प्रती चेंबर > २५० टन)

रु ८०००/-प्रती मे.टन

(५००० मे. टन क्षमतेसाठी)

किमतीच्या ३५% सर्वसाधारण क्षेत्रासाठी व ५०% डोंगरी व अनुसूचित क्षेत्रासाठी (बँक कर्जाशी निगडीत)

शितगृह युनिट प्रकार २

(एकापेक्षा अधिक उत्पादने व तापमानासाठी)कमीतकमी ६ चेंबर किवा त्यापेक्षा जास्त

(प्रती चेंबर< २५० टन)

रु १००००/-प्रती मे.टन

(५००० मे. टन क्षमतेसाठी)

किमतीच्या ३५% सर्वसाधारण क्षेत्रासाठी व ५०% डोंगरी व अनुसूचित क्षेत्रासाठी (बँक कर्जाशी निगडीत)

शितगृह युनिट प्रकार २

 (नियंत्रित वातावरणसाठी नवीन तंत्रज्ञान राबवणे)

रु १००००/-प्रती मे.टन

(५००० मे. टन क्षमतेसाठी)

किमतीच्या ३५% सर्वसाधारण क्षेत्रासाठी व ५०% डोंगरी व अनुसूचित क्षेत्रासाठी (बँक कर्जाशी निगडीत)

शितसाखळीमध्ये नवीन तंत्रज्ञान राबवणे व शितसाखळीचे आधुनिकीकरण करणे

रु.२५ लाख प्रती युनिट

 

किमतीच्या ३५% सर्वसाधारण क्षेत्रासाठी व ५०% डोंगरी व अनुसूचित क्षेत्रासाठी (बँक कर्जाशी निगडीत)

शितवाहन

रु.२६ लाख प्रती युनिट

(९ मे.टन क्षमतेसाठी)

किमतीच्या ३५% सर्वसाधारण क्षेत्रासाठी व ५०% डोंगरी व अनुसूचित क्षेत्रासाठी (बँक कर्जाशी निगडीत)

प्राथमिक/फिरते प्रक्रिया केंद्र

रु.२५ लाख प्रती युनिट

किमतीच्या ४०% सर्वसाधारण क्षेत्रासाठी व ५५% डोंगरी व अनुसूचित क्षेत्रासाठी (बँक कर्जाशी निगडीत)

रायपनिग चेंबर

रु.१ लाख प्रती मे.टन

(३०० मे.टन क्षमतेसाठी)

किमतीच्या ३५% सर्वसाधारण क्षेत्रासाठी व ५०% डोंगरी व अनुसूचित क्षेत्रासाठी (बँक कर्जाशी निगडीत)

शेतावरील कमी उर्जा वापरणारे थंड साठवणूक ग्रुह

रु.५ लाख प्रती मे.टन

(८ मे.टन क्षमतेसाठी)

ग्राह्य प्रकल्प खर्चाच्या ५०%

(बँक कर्जाशी निगडीत)

कमी किमतीचे फळ भाजीपाला साठवण केंद्र

२ लाख नवीन युनिट्साठी

१ लाख युनिट आधुनिकीकरण

ग्राह्य खर्चाच्या ५०%

 

कमी खर्चाचे कांदा साठवणूक ग्रुह/ कांदाचाळ-२५ मे.टन

१.७५ लाख प्रती युनिटसाठी

ग्राह्य खर्चाच्या ५०%

 

एकात्मिक शितसाखळी पुरवठा प्रणाली

रु.६ लाख प्रती युनिट

किमतीच्या ३५% सर्वसाधारण क्षेत्रासाठी व ५०% डोंगरी व अनुसूचित क्षेत्रासाठी (बँक कर्जाशी निगडीत)

पुसा शून्य उर्जा आधारित शितगृह -१०० किलो

रु.४००० प्रती युनिट

ग्राह्य खर्चाच्या ५०%

 

 

वरील योजना फक्त शेतकऱ्यांना माहिती व्हाव्यात या उद्देशाने प्रसिद्ध केल्या जातात योजेनेच्या उपलब्धतेविषयी तसेच अधिक माहितीसाठी संलग्न विभागाशी संपर्क साधावा. 

business magazine | chawadi

September 21, 2017

0 responses on "कोल्ड स्टोरेज आणि फळ प्रक्रिया उद्योगासाठी शासकीय योजना (भाग ४ )"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »