हळद आले लसून प्रक्रिया उद्योग

हळद आले लसून प्रक्रिया उद्योग
महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, अस्मानाबाद, लातूर नांदेड, परभणी,हिंगोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात कमालीची वाढ झालेली आहे.
सातारा, सांगली, रायगड, ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये आल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. आल्यापासून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्याचा विचार करता खानदेश व विदर्भातही या पिकाखालील क्षेत्रात वाढ होताना दिसून येत आहे.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.
हळदीचे मुल्यवर्धीत पदार्थ :
१) हळद पावडर: हळद पावडर तयार करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या हळदीचा वापर केला जातो. हळद पावडर तयार करण्यासाठी प्रथम जाड मोठ्या हळकुंडाचा इलेक्ट्रीक मोटारीवर चालणाऱ्या चक्की वजा मशीनमध्ये भरडा केला जातो.
मशीनमध्ये भरडा पुढे जाऊन हळद पावडर तयार केली जाते. ही पावडर वेगवेगळ्या मेषच्या जाळीतून बाहेर पडून शेवटी ३०० मेश जाळी मधून बाहेर पडते. तयार पावडर ५,१०,२५ किलो आकाराच्या प्लॅस्टिक किंवा कापडी पिशवीमध्ये पॅकींग करून विक्रीसाठी पाठववी जाते.
२) कुरकुमीन : वाळलेल्या हळद पावडरपासून इथाईल अल्कोहोल हे द्रावक वापरून कुरकुमीन नावाचा घटक वेगळा काढता येतो. हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातीपरत्वे २ ते ६% इतके असते. कुरकुमीनपासून अनेक आयुर्वेदिक औषधे तसेच अनेक सौंदरी प्रसाधने बनविता येतात. वाण परत्चे हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण बदलते. कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथून २००४ साली प्रसारित केलेल्या फुले स्वरूप (डी. टी. एस. २२२) या जातीमध्ये सर्वाधिक कुरकुमीनचे प्रमाण ५.२% इतके आढळून आले आहे.
३) कुंकू : हळदीचे गड्डे मुख्यत: कुंकू तयार करण्यासाठी वापरतात. अशाप्रकारे हळदीपासून कुंकू तयार करण्याचे कारखाने अमरावती, पंढरपूर, तुळजापूर, पुणे, नाशिक येथे ठिकठिकाणी देवालयाच्या परिसरात आहेत.
४) रंगनिर्मिती : लोकरी, रेशमी, सुती कपड्याला पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात. सध्या काही प्रमाणात सुती कपड्यांना हळदीचा रंग देतात. औषधे, कन्सेक्शनरी उधोगात हळदीचा रंगासाठी उपयोग होतो. वॉर्निश उद्योगातही हळदीचा उपयोग होतो.
५) सौंदर्य प्रसाधने : सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी ज्या आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड उपयुक्त ठरते. त्यामध्ये हळदीचा सिंहाचा वाटा आहे. वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये तसेच साबणांमध्ये हळदीच्या गुणधर्माचा उपयोग केलेला आढळतो. स्नानपूर्वी चेहऱ्याला व शरीराला हळद लावल्यास त्वचेला चकाकीपणा येतो. चेहऱ्याचे सौंदर्य वाढते.
६) सुगंधी तेल : हळद ही मुळातच औषधी व गुणकारी असल्यामुळे तिच्यापासून सुगंधी तेल काढता येते. हळदीच्या ताज्या गड्ड्यापासून ५ ते ६% तेल मिळते. हे तेल नारंगी पिवळ्या रंगाचे व हळदीसारखा सुवास असणारे असते.
७) हळदीचे संप्लवनशील तेल: हळदीमध्ये ३.५ टक्के संप्लवनशील तेल असते. हे तेल पिवळ्या रंगाचे असून हे वेगळे काढण्यासाठी हळदीच्या पुडीचे पाण्याच्या उर्ध्वपातन पद्धतीचा वापर करतात. हळदीच्या तेलात ६ टक्के टरमतेरोन्स व २५ टक्के झींगी बेरन असते.
८) ओलीओरिझीन निर्मिती : हळदीच्या भुकटीपासून ओलेओरीझीन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्नतंत्र संशोधन संस्थेत प्रमाणित केली आहे. रंग व स्वादाकरिता त्याचा उपयोग औषधे व खाद्य पदार्थांमध्ये करतात, म्हणून त्याला चांगली मागणी आहे. याचे शेकडा प्रमाण ५ ते ७% असून त्यातील व्होलाटाईल तेलाचे प्रमाणत १८ ते २०% आहे
९) औषधे टायर करण्यासाठी : आयुर्वेंदात हळदीचे कडू रसम उष्णवीर्य, रूक्ष, ब्रव्य , कृमीहर असे गुण सांगितले आहेत. औषधी तेल व मलम यामध्ये हळदीचा उपयोग करतात. हळद ही पाचक, कृमिनाशक, शक्तीवर्धक व रक्तशुद्ध करणारी आहे.

 त्याविषयी अधिक माहितीसाठी  खाली देलेल्या call now या ग्रीन बटनावर क्लिक करा. 

May 12, 2017

0 responses on "हळद आले लसून प्रक्रिया उद्योग"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »