शेतीमाल तारण कर्ज योजना….!

शेतीमाल तारण कर्ज योजना….!
शेतीमालाची हंगामात एकदम आवक वाढून भाव कोसळतात. अशा परिस्थितीत बिगर-नाशवंत शीलमाल तारणात ठेवल्यास शेतकऱ्यांची आर्थिक नड भागते, तसेच काही काही कालावधीनंतर शेतीमालाचे भाव वाढून त्याचा फायदा होते. कृषी पणन मंडळाने ही योजना १९९० पासून यशस्वीपणे राबविली आहे. शेतीमालाचे भाव कमी झाल्यास शेतकरी आपला माल बाजार सामितीकडे तारणात ठेवून त्या मालावर बाजार समिती साधारण ६ टक्के व्याज दराने १८० दिवसांच्या मुदतीकरिता कर्ज म्हणून शेतकऱ्यांला तात्काळ उपलब्ध करून देते. बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज रकमेची प्रतिपूर्वी पणन मंडळामार्फत केली जाते.
या योजने अंतर्गत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, करडई, धान, ज्वारी, बाजरी, मका, चना, हळद या शेतीमालाचा समावेश करण्यात आला आहे. या शेतीमालाच्या त्या दिवसाच्या बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून दिली जाते. काजू बीची बाजारभावाने होणाऱ्या एकूण किंमतीच्या ७५ टक्के किंवा ५० रू. प्रति किलो यापैकी कमी असणारी रक्कम शेतकऱ्यास मिळेल. बेदाणा शेतमालच्या बाजारभावानुसार एकूण किंमतीच्या ५० टक्के किंवा रू. ५० हजार प्रति टन यापैकी कमी असणारी रक्कम दिली जाईल. बेदाण्यासाठी ८ टक्के व्याजदर आहे. ज्वारी, बाजरी, मका गहू या पिकांसाठी बाजारभावानुसार एकुण किंमतीच्या ५० टक्के अथवा रु. ५०० प्रति क्विंवटल यापैकी कमी असणारी रक्कम मिळते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या कृषी उत्पत्र बाजार समिती अथवा कृषी पणन मंडळाचे मुख्य अथवा जवळच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधवा.
 
       उदयोगांच्या अधिक माहितीसाठी :-  7249856424

December 23, 2016

0 responses on "शेतीमाल तारण कर्ज योजना….!"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »