शेतीमाल तारण कर्ज योजना

           शेतीमाल तारण कर्ज योजना

    शेतीमालाची हंगामात एकदम आवाक वाढून भाव कोसळतात. अशा परिस्थितीत बिगर – नाशवंत शेतीमाल तारणात ठेवल्यास शेतकऱ्यांची आर्थिक नड भागते, तसेच काही कालावधीनंतर शेतीमालाचे भाव वाढून त्याचा फायदा होऊ शकतो. कृषी पणन मंडळाने ही योजना १९९० पासून यशस्वीपणे राबविली आहे. शेतीमालाचे बाजारभाव कमी झाल्यास शेतकरी आपला माल बाजार समितीकडे तारणात ठेवून त्या मालावर बाजार समिती ६ टक्के व्याजदराने १८० दिवसांच्या मुदतीकरिता कर्ज म्हणून शेतकऱ्याला तात्काळ उपलब्ध करून देते. बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज रक्कमेची प्रतिपूर्ण पणन मंडळामार्फत केली जाते.

                   या योजने अंतर्गत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, करडई, धान, ज्वारी, बाजरी, मका, चना, हळद, या शेतीमालाचा समावेश करण्यात आला आहे. या शेतीमालाच्या त्या दिवसाच्या बाजारभावच्या ७५ टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून दिली जाते. काजू बीची बाजारभावाने होणाऱ्या एकूण किंमतीच्या ७५ टक्के किंवा ५० रू प्रति.किलो यापैकी कमी असणारी रक्कम शेतकऱ्यांस मिळते. बेदाणा शेतमालाच्या बाजारभावानुसार एकूण किंमतीच्या ५० टक्के किंवा रू. ५० हजार टन यापैकी कमी असणारी रक्कम दिली जाते. बेदाण्यासाठी ८ टक्के व्याजदर आहे. ज्वारी, बाजरी, मका, गहू या पिकांसाठी बाजारभावानुसार एकूण किंमतीच्या ५० टक्के अथवा रू. ५०० प्रति क्विंटल यापैकी कमी असणारी रक्कम आपणांस मिळते.

या योजनेच्या लाभासाठी नजीकची कृषी उत्पत्र बाजार समिती अथवा कृषी पणन मंडळाचे मुख्य अथवा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

December 9, 2016

0 responses on "शेतीमाल तारण कर्ज योजना"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »