प्रत्येक भाजी ; फळापासून एवढे पदार्थ तयार केले जावू शकतात…

प्रत्येक भाजी ; फळापासून एवढे पदार्थ तयार केले जावू शकतात…
जास्तीत जास्त पदार्थांवर प्रक्रिया केल्यामुळे शेतमाल प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल व त्यापासून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकेल. भारतीय प्रक्रियायुक्त पदार्थांना चांगली बाजारपेठ असल्यामुळे परकीय चलन मिळविण्यास चांगला वाव अाहे.
देशात फळे आणि भाजीपाल्याच्या एकूण उत्पादनाच्या जेमतेम १ ते २ टक्के उत्पादनावर प्रक्रिया केली जाते, तर इतर प्रगत देशात ७० ते ८५ टक्के उत्पादनावर प्रक्रिया केली जाते.
वनस्पतिजन्य आहार हिरव्या पालेभाज्या अाणि फळभाज्या अशा दोन प्रकारात विभागला जातो. फळे व पालेभाज्यांतील आर्द्रता ठराविक मर्यादेपर्यंत कमी करून अाणि काही संरक्षक पदार्थांचा वापर करून त्यांचा टिकाऊपणा वाढविला येतो.

आज आपण बघणार आहोत कि कोणत्या भाजी ,फळापासून कोणते पदार्थ तयार केले जावू शकतात…
भाजीपाल्यापासून करता येण्याजोगे प्रक्रियायुक्त पदार्थ –
टोमॅटो – गर, केचप, सॉस, प्युरी, पेस्ट, सूप, चटणी.
केचप व सॉस तयार करण्यासाठी पूर्ण पक्व झालेली लाल रंगाची फळे निवडावीत.
बटाटा – वेफर्स, चिप्स, फ्रेंचफ्राईज, पीठ, पापड, चकल्या, किस.
वेफर्स तयार करण्यासाठी पूर्ण वाढलेली ताजे बटाटे निवडावीत.
कांदा, लसूण – सुकलेल्या पाकळ्या, पावडर, तेल, रस.
गाजर – हवाबंद डब्यात पॅकिंग, रस सरबत, कॅंडी, मोरावळा, हलवा, जाम, टुटीफ्रुटी, पावडर, टॉफी.
रताळी – वेफर्स, पीठ, स्टार्च, अल्कोहोल.
वाटाणा, घेवडा – हवाबंद डब्यात पॅकिंग, सुकविणे, गोठविणे.
मिरची – अर्क, सुकविणे, भुकटी.
कोबी, फ्लॉवर – लोणचे, गोठविणे.
दुधी भोपळा – टुटीफ्रुटी, पावडर, रस.
भेंडी – सुकविणे, हवाबंद डब्यात पॅकिंग.
कारली – रस, सुकविणे, वेफर्स, लोणची.
पालक, शेपू, मेथी, चुका – सुकविणे, पावडर.
कलिंगड, खरबूज – सरबत, शेक.
अळिंबी – सुकविणे, हवाबंद डब्यात पॅकिंग, केचप, लोणचे.
फळापासून करता येण्याजोगे प्रक्रियायुक्त पदार्थ –
आंबा – पल्प, सरबत, स्क्वॅश, सिरप, जाम, जेली, काप, टॉफी, पोळी, मुरंबा लोणची, आमसूल.
केळी – पल्प, टॉफी, चिप्स, अर्क, पावडर, पीठ, जाम, प्युरी.
पेरू – पल्प, जाम, जेली, टॉफी, नेक्‍टर, रस, अर्क, स्क्वॅश, पेक्‍टीन.
सीताफळ – पल्प, जाम, टॉफी, सरबत, आइस्क्रीम.
आवळा – कॅंडी, रस, स्क्वॅश, लोणची, सुपारी, मोरावळा, च्यवनप्राश.
पपई – जेली, लोणची, जाम, कॅंडी, प्युरी, नेक्‍टर, पावडर, टॉफी, टुटीफ्रुटी, पेपेन.
जांभूळ – गर, सरबत, स्क्वॅश, वाईन, अर्क.
डाळिंब – रस, सरबत, सिरप, अर्क, अनारदाना, अनाररब, सालाची पावडर.
चिकू – पल्प, सरबत, शेक, टॉफी, जाम, कॅंडी, पावडर.
अंजीर – सुके अंजीर, टॉफी, जाम, पल्प.
लिंबू – रस, स्क्वॅश, सायट्रिक आम्ल.
मोसंबी – रस, स्क्वॅश, सिरप, जाम, जेली.
संत्रा – रस, स्क्वॅश, सिरप, जाम, जेली, मर्मालेड.
चिंच – गर, पावडर, सरबत, टॉफी
कवठ – जेली, सरबत, टॉफी, पावडर.
करवंद – गर, जाम, जेली, सरबत, लोणची, नेक्‍टर.
[wcps id=”5510″]
उद्योगाला चालना देण्यासाठी शासनाच्या विविध योजना
देशांतर्गत व परदेशी बाजारपेठ कशी मिळवायची? प्रक्रिया करताना अावश्यक साधनांची उपलब्धता, संपर्क साधने, कच्च्या मालाची उपलब्धता, तांत्रिक मार्गदर्शन, वित्तीय सहाय्य इ. महत्त्वाच्या बाबीकरिता कृषी आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात विकास संस्था भाजीपाला व प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्यात सहकार्य करते. चावडी सारख्या संस्था या संदर्भात मार्गदर्शन करतात. प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी उद्योग संचालनालयामार्फत बेरोजगार युवकांसाठी संकलित कर्ज योजना जिल्हा उद्योग केंद्र योजना नॅशनल इक्विटी मिळविता येतो. खादी ग्रामोद्योग मंडळ, नाबार्ड, कृषी विभाग या संस्थाही सहकार्य करतात. प्रशिक्षणासाठी चावडी  संस्था कार्यरत आहे.अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही उद्योगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी संपर्क 7249856425 या क्रमांकावर संपर्क साधा..
May 21, 2017

0 responses on "प्रत्येक भाजी ; फळापासून एवढे पदार्थ तयार केले जावू शकतात..."

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!