१. सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या बँकेत लोनसाठी तुम्ही अर्ज करणार आहात त्या बँकेत तुमचे खाते असले पाहिजे व त्या खात्यावरून तुम्ही व्यवहारसुद्धा केलेले असले पाहिजेत.
२. जर तुमचे खाते नसेल तर तुमच्या कुटुंबातील व्यक्तिपैकी एखाद्या व्यक्तीचे खाते सदर बँकेत असायला हवे. व त्या खात्यावर व्यवहार सुद्धा असायला हवेत.
3. तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचा सीबील स्कोअर चांगला असायला हवा.
४. बँकेत लोन प्रोसेस करण्यासाठी तुमच्या प्रोजेक्ट संदर्भातील संपूर्ण माहिती पाहिजे , तुमच्या प्रोजेक्टबद्दलचे सगळे ज्ञान तुम्हाला असायलाच हवे. जसे की कच्चा माल तुम्ही कोठून मागवणार?, मार्केटिंग कसे करणार?, प्रोजेक्टची कॉस्ट किती आहे?, मशीनरीसाठी किती पैसे लागतील? मशीनरी कोठून मागवणार आहात? शेडची कॉस्ट किती आहे? पॅकिंगसाठी किती खर्च येणार आहे?, तुम्हाला मार्जिन किती मिळणार आहे या प्रोजेक्ट मधून इत्यादी सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत.