प्रोजेक्ट रीपोर्टमध्ये खालील गोष्टी अंतर्भूत असतात-
भाग १- उद्योजकाची ओळख- यामध्ये तुमचे नाव, गाव, पत्ता, संपर्क क्रमांक, तुमची शैक्षणिक पात्रता, उद्योगसंबंधी तुम्ही एखादे प्रशिक्षण घेतले असेल तर त्याविषयी माहिती इत्यादी गोष्टी यामध्ये समाविष्ट असतात.
भाग २- प्रोजेक्टची माहिती- तुमचा प्रोजेक्ट नक्की काय आहे, प्रोजेक्टला या भागात स्कोप आहे का, प्रोजेक्टला मार्केटमध्ये स्कोप आहे का, कच्चा माल कोणता लागतो, तो तुम्ही कोठून मागवणार आहात, कच्चा मालाला खर्च किती येणार आहे, तुमच्या उत्पादनाची प्रक्रिया काय असणार आहे, जागा, शेड, पाण्याची उपलब्धता, रोड, वीज उपलब्धता इत्यादी गोष्टींची संपूर्ण माहिती प्रोजेक्ट रीपोर्टमध्ये दिलेली असते.
भाग ३- प्रॉडक्शन व मार्केट- जे प्रॉडक्ट तुम्ही बनवणार आहात त्याचे मार्केट तुम्ही कसे मिळवणार, मागणी व पुरवठा त्या मालासंदर्भात सध्या कशाप्रकारे आहे, तयार माल तुम्ही कसा व कोणामार्फत विकणार आहात, तुमचे एकूण उत्पादन किती असणार आहे, तुमच्या यूनिटची, मशीनरीची क्षमता व कॉस्टिंग किती असणार आहे अशी प्रॉडक्शन व मार्केट संबंधित माहिती या भागात असते.
भाग ४- प्रोजेक्टचा आर्थिक ताळेबंद- तुमच्या प्रोजेक्टचा सर्व आर्थिक खर्च व कॉस्टिंग या भागात दिलेली असते. जागा, शेड, मशीनरी, उत्पादना व्यतिरिक्त खर्च, कच्चा मालासाठी लागणारा खर्च असा सर्व खर्च या भागात दिलेला असतो. आपल्या प्रोजेक्टच्या खर्च व उत्पन्नाचा संपूर्ण ताळेबंद याठिकाणी असतो. या व्यतिरिक्त तुम्ही किती काळात म्हणजे ५ वर्षे, १० वर्षे कर्ज परत करू शकतो ते ही याठिकाणी नमूद करावे लागते. तसेच या काळात खर्च वजा करून तुम्हाला उत्पन्न किती मिळणार आहे व तुम्ही बँकेला हप्ता किती देणार आहात याचाही समावेश या भागात होतो