दुग्धोत्पादनावर आधारित उदद्योग

खवा निर्मिती

प्रकल्पाची ओळख :

शासनाकडून शेतकर्‍यांना जोडधंदा म्हणून गाई –म्हशींच्या खरेदीसाठी अल्प व्याजदराने कर्जपुरवठा केला जात आहे. शेतकऱ्याला जोडधंदा मिळाल्याने त्यालाही आर्थिक प्राप्ती होऊ लागली आहे. दुधाची भरपूर आवक होत आहे. या दूधाचे वितरण व्यवस्थित व्हावे,शेतकर्‍याला रास्त भाव मिळावा म्हणून शासनाने गाव पातळीवर दूध सोसायट्या  काढल्या आहेत. आज गरज आहे ती हे दूध बाहेर पाठवून कमी दराने विकण्यापेक्षा त्या दूधावर प्रक्रिया करून दूग्धजन्य  पदार्थाची निर्मिती करण्याची. हे काम त्या-त्या गावात महिलाही करू शकतात. खवा तयार करणे हा व्यवसाय महिला व महिलाच्या बचतगटांना करता येण्यासारखा उद्योग आहे. या उद्योगाकरिता अन्न आणि औषध प्रशासनाचा दाखला आवश्यक आहे. व्यवसाय महानगरपालिकेच्या हद्दीत असेल तर त्यांच्या आरोग्य विभागाकडून हा दाखला मिळतो व ग्रामीण भागात असेल तर महा संचालक अन्न व औषध प्रशासन,महाराष्ट्र शासन यांच्याकडे मिळतो.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

प्रकल्पाचा आराखडा :

  • उत्पादन प्रक्रिया /कार्यप्रक्रिया :

खवा म्हणजे दुधातील पातळपणा कमी करण्यासाठी उकळून त्याचे घन रूपांतर करणे .
 

कृती :

       पाणी न घातलेले दूध कढईत उकळत राहावे.सतत उलथन्याने हालवत राहावे. दूधातील पातळपणा कमी होत जातो. खवा तयार होतो. इंधनाचा खर्च वाचवण्याकरिता सौरऊर्जेचा वापर करता येतो. हा माल विक्रीस पाठवतात .
 

  • प्रकल्प क्षमता :

                                हा प्रकल्प माध्यम स्वरूपाचा असून या प्रकल्पात व वार्षिक १८००० कि.ग्रॅ. इतके खव्याचे उत्पादन घेणे अपेक्षित आहे.
 

  • बाजार पेठ / संभाव्य ग्राहक वर्ग :

ज्या दुकानात दूध व दूग्धजन्य शीतपेये विक्रीसाठी फ्रीज आहे अशा जवळपासच्या दुकानदारांना रोज ताजा माल तयार करून विक्रीसाठी द्यावा. असे दुकानदार आपला माल नक्की विक्रीसाठी ठेवतील. अर्थात त्यांना इतर ठिकाणच्या खव्यापेक्षा नफ्याचे मार्जिन थोडेसे जास्त ठेवले पाहिजे. सुरवातीला या व्यवसायाकरिता थोडीशी जाहिरातीची गरज आहे. स्थानिक वर्तमानपत्राच्या डीलरला हाताशी धरून वर्तमानपत्रातून आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हँडबिले टाकावीत.
स्थानिक दुकानदारांच्या स्वीट होमवाल्यांच्या समक्ष भेटी घ्याव्यात .त्यांना मालाचे नमुने द्यावेत .शहरातील प्रमुख विक्रेत्यांशी संपर्क साधून विक्रीचा प्रयत्न करावा. त्यांच्या ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मालाचा दर्जा उत्तम, किमत वाजवी ठेवावी. मी या व्यवसायात चिकाटीने प्रयत्न करून यशस्वी होईनच, असा सकारात्मक विचार सतत मनात ठेवावा, आपल्या दर्जेदार मालामुळे व्यवसायाचा एकदा जम बसला कि, दुकानदार मागणी करतील जसजशी आपली विक्री वाढेल तसतशी आपली उलाढाल वाढेल त्या प्रमाणात आपला नफा वाढेल. सतत सर्व बाजूंनी प्रयत्न करत राहिल्यास बाजारपेठ मिळून व्यवसायात वाढ होण्यास वेळ लागणार नाही. ग्राहक मिळवणे व तो टिकवणे हीच मोठी बाब आहे.
 

  • उपलब्ध जागा :

       ४०० चौ.फूट आच्छादित / इमारत.
 

  • उपयुक्तके /मूलभूत सुविधा :

       सिंगल फेजचे वीज कनेक्शन, पाणी गरजेनुसार.
 

  • मनुष्यबळ / कर्मचारी वर्ग आवशक्यता :

       उद्योजक स्वत: उत्पादन प्रक्रियेत सहभागी होणार असून, त्याच्यासह १ कुशल व १ अकुशल कामगार असे एकूण ३ लोक काम करणार आहेत असे गृहीत धरले आहे.
 

७. भांडवलाचा तपशील :

७.१ स्थिर भांडवल :(१महिन्यासाठी ):

अ.क्रतपशीलनगदरएकूण किंमत
१.
 
 
 
 
 
२.
३.
 
यंत्रसामग्री व साहित्य :
१.       खवा संयंत्र
२.       फ्रीजर
३.       सीलिंग मशीन (पॅडल ओपरेटेड )
४.       विविध भांडी व उपकरणे
५.       दूध कॅन
फर्निचर
पूर्व –उत्पादन खर्च
 


 
 
४५,०००
३०,०००
५,०००

८००

 
 
४५,०००
३०,०००
५,०००
४,०००
४,०००
६,०००
१०,०००
एकूण१,०४,०००

७.२ खेळते भांडवल ( १महिन्यासाठी ) :

अ) प्रमुख बाबी :

१) कच्चा माल व साहित्य :

अ.क्रतपशीलप्रमाणदर (रु .)एकूण किंमत
१.
२.
 
दूध
पॅकेजिंग सामान
६२५० लि .
३० रु / लि .

 
१,८७,५००
१,५००
 
एकूण१,८९,०००

 

२) मनुष्यबळ /कर्मचारीवर्गावरील खर्च :

अ.क्रतपशीलसंख्याप्रत्येकी दरमहा वेतन (रु )एकूण किंमत (रु )
१.
२.
३.
 
कुशल
अकुशल
भत्ते व इतर सवलती
(एकूण वेतनाच्या २० %) 
८,०००
६,०००

 
८,०००
६,०००
२,८००
 
एकूण१६,८००

 
 
 
 
 
ब) एकूण खेळते भांडवल (१ महिन्यासाठी ) :

अ.क्रतपशीलनगदरएकूण किंमत
१.
२.
३.
४.
 
 
५.
६.
७.
८.
कच्चा माल व साहित्य
कर्मचारीवर्गावरील खर्च
देखभाल –दुरूस्ती
मूलभूत सुविधा
०१. वीज
०२. पाणी
इंधन (गॅस )
प्रशासकीय खर्च
जाहिरात
जागा भाडे 
१०० यूनिट 
८ रु. /यूनिट
१,८९,०००
१६,८००
१,०००
 
८००
४,००
७,०००
२,०००
१,०००
२,०००
२,२०,०००

 
८. भांडवलाची उभारणी :

अ.क्रतपशीलरक्कम (रु .)अ.क्रतपशीलरक्कम (रु .)
१.
२.
 
स्थिर भांडवल
खेळते भांडवल
 
 
 
एकूण
१,०२,०००
२,२०,०००
१.
 
२.
 
स्वत:चे भाग भांडवल
(२५ %)
अपेक्षित बँक कर्ज
(७५ %)
 
एकूण
७६,०००
 
२,२८,०००
 
 
,०४,०००,०४,०००

 

९. नफा –तोता पत्रक (वार्षिक ) :

अ ) एकूण उत्पन्न :

अ.क्रउत्पन्नाच्या बाबीवार्षिक उत्पन्नाचा तपशीलएकूण उत्पन्न
१.
 
खवा विक्री .१८० रु /कि.ग्रॅ. दराने दरमहा १५०० कि.ग्रॅ. =२,७०,०००दरमहा २,७०,०००रु X १२ महीने३२,४०,०००
एकूण३२,४०,०००

 

ब ) एकूण खर्च रुपये (वार्षिक ) :

अ.क्रतपशीलखर्च (रु )
१.
२.
 
 
३.
४.
खेळते भांडवल
घसरा :
१.       यंत्र सामग्री व साहित्य (२० %)
२.       फर्निचर (१५ %)
विमा (विक्रीवर २ %)
बँक कर्जावरील व्याज
२६,४०,०००
 
१७,६००
९००
६४,८००
२४,१५०
 
एकूण२७,४७,४५०

 
८. निव्वळ उत्पन्न रुपये :
= स्थूल उत्पन्न – एकूण खर्च- मुद्दल हप्ता
= ३२,४०,००० – २७,४७,४५० – १,०८,५००
= ३,८४,५५० रु.
९. ना नफा ना तोता बिन्दु :
 
निश्चित खर्च X १००           २७,४७,४५० X १००
————————————-  = ——————————–    =    ८८ %
निश्चित खर्च + निव्वळ नफा       २७,४७,४५० + ३,८४,५५०
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

January 11, 2018

1 responses on "दुग्धोत्पादनावर आधारित उदद्योग"

  1. विठल वसंत लिमकरMarch 3, 2018 at 5:43 pmReply

    सर मला दूध व्यावसाय करायचाय तर याच ट्रनीग मला चावडीकडुन कूट मिळेल

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »
error: Content is protected !!