Custard Apple

Description:

सिताफळ प्रक्रिया  प्रोसेसिंग प्रशिक्षण कार्यक्रम – सिताफळ हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे फळ पिक आहे. या फळाची सुमारे ७५,००० टन आवक ह्या राज्यातून उपलब्ध होते. सिताफळ हे एक कठोर फळ आहे, जे शेतजमीन नसलेल्या भागात देखील घेतले जाऊ शकते. सिताफळ भारतात सुमारे 40,000 हेक्टर क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश, आसाम, तामिळनाडू या राज्यांमध्ये उगवले जाते आणि दख्खनच्या पठारावर आणि मध्य भारताच्या काही जंगली  भागात वाढवली जातात.
सिताफळ हे स्वादिष्ट आणि पौष्टिकदृष्ट्या मौल्यवान फळांपैकी एक मानले जाते. सिताफळ खाण्यायोग्य, मऊ, दाणेदार, रसाळ आणि गोड असलेले फळ थोड्या अम्ल युक्त असते. आइस्क्रीम, कस्टर्ड पावडर, जॅम, कन्फेक्शनरी आणि काही दुग्धजन्य पदार्थांमध्ये त्यांचा वापर केला जातो, तसेच यातील काही घटकांचा वापर औषध म्हणून देखील केला जातो.
सिताफळ हे पिकलेले असतानाच त्यातील गर खालला  जातो, सिताफळाची त्वचा आणि बिया अखाद्य आहेत. सिताफळाच्या गराचा फ्रूट सॅलड्स, आईस्क्रीम, मिल्कशेक आणि लस्सी मध्ये वापर केला जातो.
सिताफळाच्या बियांचे त्वचेवर आणि विशेषतः डोळ्यांवर विषारी परिणाम होतात. अभ्यासक सांगतात की सिताफळाच्या बियांची पावडर जर वापरण्यात अली तर  त्वचेत तीव्र वेदना आणि लालसरपणा येऊ शकतो. तसेच या पावडर मुळे डोळ्यांना दुखापत होऊन अंधत्व येऊ शकते. त्यामुळे सामान्यतः कस्टर्ड सिताफळाच्या बियांचा  वापर टाळण्याचा सल्ला दिला जातो.

Training Program

January 6, 2023

0 responses on "Custard Apple"

Leave a Message

All Right Reserved.