प्लॅस्टिक खेळणी तयार करणे…!

       प्लॅस्टिक खेळणी तयार करणे…!

प्लॅस्टिकच्या बाहुल्या, मोठ्या व छोट्या आकाराचे चेंडू,  हलक्या बॅट्स,  भिंगऱ्या,  भोवरे,  शिट्ट्या,  बोटी,  आगगाडी,  मेकॅनोसेट्स व तत्सम खेळणी म्हणजे मुलांचा खरा आंनद या खेळण्यांना बाजारात सतत मागणी असते.

       उद्योग :-

         प्लॅस्टिकची खेळणी बनविणे हा उदयोग महिलांसाठी योग्य असा एक लघु उद्योग आहे.  कारण या व्यवसाय कमी गुंतवणूक करून सुरु करता येतो.  यामध्ये चेंडू,  हलक्या बॅट्स, भिंगाऱ्या, भोवरे, शिट्टया, बोटी,  आगगाडी, मेकॅनोसेट्स अशा अनेक प्रकारच्या खेळणी  या उद्योगात बनविता येतात.  खेळणी बनविणे एकदम सोपे व कमी गुंतवणुकीचा व्यवसाय आहे. प्लॅस्टिकची खेळीणी बनविण्यासाठी प्लॅस्टिक इंजेक्शन मोल्डिंग मशिन, विविध खेळण्यांचे विविध साचे, प्लॅस्टिकच्या बाजारात मिळणाऱ्या तयार पावडर्स किंवा ग्रॅन्युएल्स, खेळण्यांचे विविध भाग चिकटविण्यासाठी लागणारे सोल्युशन इत्यादी वस्तू प्लॅस्टिकच्या खेळणी बनविण्यासाठी लागतात.

      बाजारपेठ :-
संपूर्ण जगातील खेळणी बनविणाऱ्या कंपन्यांचे लक्ष भारतीय बाजारपेठेकडे आहे. कारण भारतीय बाजारपेठ ही खेळणीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी प्रसिध्द आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जत्रा, यात्रा, सण,उत्सव, तसेच विविध बाजारात या खेळणीला चांगली मागणी असते. प्लॅस्टिकची खेळणीची किरकोळ विक्री प्रामुख्याने जनरल स्टेअर्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, किरणा दुकाने आणि स्टोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात होते. प्लॉस्टिकच्या खेळणी मध्ये कोणताही प्रमुख ब्रॅण्ड नाहीत. त्यामुळे या खेळणीला अनेक ठिकाणी बाजारपेठ सहज उपलब्ध होते.
    प्रकल्पविषय :-
हा उद्योग सुरु करण्यासाठी साधारण १ ते २ लाख रूपये खर्च येतो. उद्योग सुरु झाल्यावर खर्च कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. तसेच बॅक सुध्द आपली पत पाहून कर्ज पुरवठा करते.  हा उद्योग सुरु केल्यानंतर आपण एक चांगले उद्योजक होऊ शकता.
द्योगांच्या अधिक माहितीसाठी :- 7249856424.

December 24, 2016

0 responses on "प्लॅस्टिक खेळणी तयार करणे…!"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »