सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग ( Cotton Seed Oil & Cake)

सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्यात मोठ्या प्रमाणात सरकी  पेंडचा चा वापर केला जातो. आणि विशेष म्हणजे याच्या मार्केटिंग साठी फार कष्ट घेण्याची आवश्यकता नसते.अगदी लोकल लेव्हल ला हा माल विकला जावू शकतो.

चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

ओळख :

सरकीच्या आतल्या गाभ्यात दोन दलांमध्ये अंकुर व बाकी भाग चरबी, प्रोटीनयुक्त असतो. सरकीचा मुख्यत्वे दुभत्या जनावरांना खाण्यासाठी आणि तेल काढण्यासाठी उपयोग होतो. दुभत्या जनावरांना दुध वाढीसाठी काही प्रमाणातच खाणण्यास दिली जाते. आजकाल महागाईमुळे सरकी ऐवाजी तेल काढल्यानंतर पेंडच जनावरांना खाण्यास दिली जाते. त्यामुळे जवळजवळ ५० % सरकी ही तेल उद्योगातच वापरली जाते.

 

तेल काढण्याच्या यांत्रिकी तीन पद्धती आहेत.

१) पाण्याच्या दाबाचे यंत्र म्हणजे सर्वात जुनी हायड्रोलिक प्रेस पद्धत .

२) यांत्रिक दाब (स्क्रू प्रेस) देऊन तेल काढणे ही आधुनिक पद्धत आहे .

३) रासायनिक पद्धतीने (solvent Press) तेल काढणे .

या तीन पद्धतीने पहिल्या दोन पद्धतीमध्ये १ ते २ % तेल पेंडीत राहते, मात्र तिसर्‍या (solvent) पद्धतीत १०० % तेल निघते. यातील पहिली पद्धत मुख्यत्वे वापरली जाते. ह्या पद्धतीत मनुष्यबळ कमी लागून ती आटोपशीर आहे. यातील सर्वांत उत्तम पद्धत म्हणजे सॉल्व्हंट पद्धत, पण या पद्धतीकरिता यंत्रसामग्री लागते. ती महाग व हाताळणीसाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. अन्यथा धोका संभवण्याची शक्यता असते. नवीन तेल घाण्यात स्क्रू व सॉल्व्हंट या दोन्ही पद्धती एकदम वापरल्या जाऊन यामध्ये स्क्रू पद्धतीने तेल काढून राहिलेले तेल सॉल्व्हंट पद्धतीने काढले जाते.

 

उपयोग

सरकीचे तेल इतर तेलाच्या मानाने स्वस्त असून यात तयार केलेले पदार्थ अधिक दिवस टिकतात. त्यामुळे या तेलाचा वापर फरसाण (शेव, चिवडा, पापडी इ.) तयार करण्यासाठी देशभर मोठ्या प्रमाणात केला जातो. शेव आणि मुरमुरे हे गरीबांचे खाद्य तर श्रीमतांचे हौशी खाद्य असल्याने हा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. यामध्ये शेंगदाणा तेल वापरून तयार केलेला फरसाण जड दिवस झाल्यास खौट लागतो. त्यामुळे सरकीच्या तेलाला मोठी मागणी आहे.

सरकी पेंड मोठ्या प्रमाणात पशु खाद्य म्ह्णून वापरली जाते आणि त्यासाठी फार मोठी बाजारपेठ महाराष्ट्रभर उपलब्ध आहे.

 

उद्योग सुरु करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट

साधारण हा उद्योग सुरु करण्यासाठी साधारण ८-९ लाख रुपये मशिनरी ला खर्च येतो. तसेच बांधकामासाठी साधारण १-२ लाख खर्च अपेक्षित आहे. मागणीनुसार आणि क्षमतेनुसार हा खर्च कमी जास्त होवू शकतो.

 

टिप्स

कच्चा माल योग्य सिझन मध्ये खरेदी करून ठेवणे हे या उद्योगात फार महत्वाचे असून त्यावर आर्थिक फायदे अवलंबून असते.

सरकी सिड मध्ये आद्रता चे प्रमाण १४-१५ % असणे आवश्यक आहे .अन्यथा त्यातून तेल कमी मिळते.

 

हातभार

या उद्योगास शासनाकडून प्रोसाहान्पर अनुदान (सबसिडी) मिळते तसेच पत पाहून बँक कर्ज पुरवठा करू शकते.

 

या उद्योगाच्या अधिक माहितीसाठी चावडी मध्ये प्रशिक्षण आयोजित केले असून यामध्ये या उद्योगाची संपूर्ण माहिती दिली जाणार असून यशस्वी उद्योजकांना भेटी सुद्धा दिल्या जाणार आहेत तरी
    अधिक माहिती साठी खाली दिलेल्या call now या बटनावर क्लिक करा किंवा कॉल करा 

 

November 11, 2017

4 responses on "सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग ( Cotton Seed Oil & Cake)"

  1. खूप चागली माहिती पाठवली साहेब.

    • सुनिल दत्तू राठोड JalnaMarch 10, 2018 at 9:15 pmReply

      मी सरकी पेंड सेल करण्यांचा माझा व्यवसाय आहे

  2. खुप महत्व पूर्ण माहिती आहे मी या विषयात उद्योग तयार करिता पाहत असतान आपली माहिती खूप चागली लाभली मला हा उद्योग करायचा आहे त्या करिता मला आपण माहिती देऊन मला सहकार्य करावे

  3. Nice infarmation

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »
error: Content is protected !!