दूध देणाऱ्या गाई म्हशींसाठी परिपूर्ण आहार, सोनाई पशु आहार

Popular 

 Agriculture Feed Products / sushantjadhav.3431

*सोनाई पशु आहार संबंधीत माहिती*

आपल्या गाई/म्हशीच्या दुधाला कधी कधी चांगली Fat लागते परंतु SNF लागत नाही किंवा SNF लागते पण फॅट लागत नाही, हा बऱ्याच पशुपालकांचा अनुभव असणार. डेअरीला दुध घालताना Fatआणि SNF ह्या दोन्ही गोष्टी जर नेमून दिलेल्या प्रमाणात असतील तरच दुध घेतले जाते व चांगला भाव मिळतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की, जनावराला चांगला खुराक देऊन पण हा प्रोब्लेम का होत असेल? ह्या प्रोब्लेमची उकल करण्यासाठी आपण पहिल्यांदा दुधामध्ये Fat आणि SNF हे नेमके काय असते व ते कमी जास्त कसे होते हे थोडक्यात पाहूयात.

गाईच्या दुधात साधारण पणे 85 ते 88% पाण्याचे प्रमाण असते व तेच म्हशीच्या दुधात 83 ते 85% पाण्याचे प्रमाण असते, या पाण्याव्यतिरिक्त उरलेल्या पदार्थातील स्निग्धांश घटक म्हणजेच fat व या स्निग्धांश व पाण्या व्यतिरिक्त राहिलेला घटक म्हणजे SNF. आता दुधातील हे घटक कसे तयार होतात ते पाहूया.

*पाणी*- दुधातील पाणी हे जनावरने पिलेल्या पाण्यापासून येते.

*फॅट*- दुधातील फॅट हे प्रामुख्याने खाद्यातील फॅट, शरीरात साठलेली चरबी व कासेत तयार होणारे फॅट यापासून बनलेले असते. जनावरांना चारयामध्ये जर उर्जा व तंतुमय पदार्थ जास्त असलेले घटक खायला घातले तर जनावराच्या शरीरात असणारया उपयोगी सूक्ष्मजीवाची चांगली वाढ होते व ते पुरेशा प्रमाणात फॅट तयार करतात व हे फॅट रक्तामार्फत कासेत येऊन दुधात उतरते.

*SNF* (Solid Not Fat)– म्हणजे फॅट सोडून इतर स्थायू घटक (प्रथिने-केसिन, जीवनसत्वे, खनिजे, लॅक्टोज). केसिन हा दुधातील SNF वर परिणाम करणारा मुख्य घटक आहे. याचे प्रमाण जर कमी झाले तर दुधाला SNF लागत नाही असे संशोधनातून सिद्ध झालेले आहे. दुधात केसिन मुक्त स्वरुपात न आढळता फ़ॉस्फेट व कॅल्सियम सोबत आढळते.
आता आपल्या लक्षात आलेच असेल की दुधातील केसिन म्हणजेच SNF वाढवायचे असेल तर प्रथिने, कॅल्सियम व फॉस्फरस हे तिन्ही घटक जनावरास देणे आवश्यक आहे. यापैकी प्रथिने हे द्विदल वनस्पती मध्ये आढळून येतात द्विदल वनस्पती म्हणजे ज्या चारा वनस्पतीची पाने छोटी असतात अशा वनस्पती उदा. मेथी ग्रास, चवळी, बरसीम इ. याशिवाय क्षार मिश्रणात कॅल्सियम व फॉस्फरस हे घटक असतात.
थोडक्यात दुधातील घटक कशापासून तयार होतात ? जनावरास काय द्याल ?
फॅट तंतुमय/उर्जा असणारे पदार्थ एकदल (लांब पानाच्या वनस्पती), धान्याचा भरडा, SNF प्रथिने, कॅल्शियम व फॉस्फरस द्विदल (लहान पानाच्या वनस्पती) आणि क्षारमिश्रण, खुराक.
आता तुम्हाला विचार पडेल कि हे सर्व धान्याचा भरडा, SNF प्रथिने, कॅल्शियम व फॉस्फरस द्विदल (लहान पानाच्या वनस्पती) आणि क्षारमिश्रण, उर्जा आणि तंतुमय पदार्थ सहज आणि कसे उपलब्ध होतील तर याच उत्तर आहे *सोनाई पशु आहार*

*सोनाई पशु आहार समवेत दुधाळ जनावरांची काळजी कशी घ्याल ?”*
– जनावरांना सोनाई पशु आहार जनावराच्या दुधाच्या क्षमतेनुसार देणे गरजेचे आहे. (गाई साठी प्रतिलिटर 350 ग्रॅम व म्हशींकरिता 400 ग्रॅम प्रतिलिटर)
– वर्षभर जो चारा उपलब्ध असेल तो जनावरांना खाऊ न घालता, चाऱ्याचे नियोजन करून जनावरांना योग्य प्रमाणात वर्षभर हिरवा व सुका चारा खाऊ घालावा.
– दुधातील स्निग्धांशांचे प्रमाण वाढविण्यासाठी पशु आहार समवेत चाऱ्यातून मिळणारे ॲसिटिक आम्ल महत्त्वाचा घटक आहे. हे आम्ल तयार होण्यासाठी सुक्‍या चाऱ्यातील सेल्युलोज महत्त्वाचे आहे. त्यासाठी गाई – म्हशींना हिरव्या चाऱ्याबरोबर सुका चारा देणे गरजेचे आहे.
– जनावरांच्या आहारात उसाचा जास्त वापर टाळावा, कारण जनावरांच्या आहारात साखरेचे प्रमाण वाढले, तर दुधातील स्निग्धांशांच्या प्रमाणावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
– दूध काढण्याच्या दोन वेळांमध्ये जास्तीत जास्त १२ तासांचे अंतर असावे. दूध काढण्यातील अंतर समान असावे. जर सकाळी सहा वाजता दूध काढले, तर सायंकाळी सहा वाजता दूध काढावे. अंतर वाढले तर दूध वाढते; पण फॅट कमी होतात. दूध सात मिनिटांमध्ये पूर्णपणे काढावे.
– गाई – म्हशींना खाद्य म्हणून बारीक दळलेले धान्य किंवा तेल देऊ नये.
– आनुवंशिकता किंवा जनावराची जात स्निग्धांशाच्या दृष्टीने महत्त्वाचे कारण मानले जाते. दूध उत्पादनक्षमता आणि स्निग्धांशाचे प्रमाण हे गुणधर्म गुणसूत्राद्वारे नियंत्रित केले जातात. देशी गाईंमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण चार टक्‍क्‍यांच्या पुढे आढळते. जर्सी गाईच्या दुधात पाच टक्के, तर होलस्टीन फ्रिजीयन गाईच्या दुधात ३ ते ३.५० टक्के एवढ्या कमी प्रमाणात स्निग्धांश आढळतात. दूध उत्पादन आणि स्निग्धांशांचे प्रमाण यांचा खूप जवळचा संबंध आहे. होलस्टीन फ्रिजीयन गाईचे दूध उत्पादन जास्त असले तरी दुधातील स्निग्धांशांचे प्रमाण कमी असते.
-जनावराचे वय जसजसे वाढते, तसतसे दुधातील फॅटचे प्रमाण कमी कमी होत जाते. जास्त वयस्क जनावरे, सातव्या विताच्या पुढील दुधाळ जनावरे गोठ्यात ठेवू नयेत.
-दुधाळ जनावरांना शक्‍य असल्यास मोकळे सोडावे, जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल. व्यायाम झाल्यामुळे गाईंच्या दूध उत्पादनात व फॅटच्या प्रमाणात वाढ झालेली दिसते.
– पहिल्या वितात फॅटचे प्रमाण जास्त मिळते, नंतर ते कमी होत असते. साधारणपणे सात ते आठ वितांनंतर दुधातील फॅटच्या प्रमाणात लक्षणीय घट होते.
– सर्वसाधारणपणे दूध वाढले की फॅटचे प्रमाण कमी होते, तर दूध उत्पादन कमी झाले की दुधातील फॅट वाढते. पावसाळ्यात, हिवाळ्यात हिरवा चारा मुबलक असल्याने जनावरांचे दूध उत्पादन वाढते आणि दुधातील फॅटचे प्रमाण कमी आढळते. याउलट उन्हाळ्यामध्ये कोरड्या वैरणीचा समावेश असल्याने दुधातील स्निग्धांश वाढलेले दिसून येते.
– उन्हाळ्यामध्ये तापमानात जास्त वाढ झाल्यास जनावरे जास्त पाणी पितात व कमी चारा खातात. अशावेळी त्यांच्या शरीरातील तापमान वाढल्यामुळे दूध उत्पादन आणि स्निग्धांशांचे प्रमाण कमी होते.
– दूध काढताना जनावराची कास स्वच्छ धुवावी, म्हणजे कासेतील रक्ताभिसरण वाढेल व दुधातील स्निग्धांशांच्या प्रमाणात देखील वाढ होईल.

*सोनाई पशु आहार भिजवून खायला का देऊ नये ?*
जनावरांना भिजवून घातलेले पशु खाद्य जनावरे न चावता गिळून घेतात व भिजवलेले पातळ अन्न रवंथ प्रक्रियेकरिता पुन्हा तोंडात येत नाही, परिणामी लाळ तयार होण्याचे प्रमाण कमी होते व जनावरे अँसिडोसीसचे (पित्त) शिकार होतात. अँसिडोसीसने जनावरांना १)शारीरिक कमकुवतता येते, २)शेण पातळ होते
३)पचन प्रक्रिया बिघडते ४) दुधाची गुणप्रत व दुधाचे उत्पादन हि घटते ५) लठ्ठपणा येऊ शकतो ६) पल्स दर आणि श्वसन दर वाढत जाऊ शकतो

*सोनाई गोळी पेंड /कांडी पेंड च उत्तम का आहे ?*
काही पशुपालक गाई – म्हशींच्या आहारात खाद्याबरोबर तेलाचा वापर करतात. आहारात सरकीच्या तेलाचा अंश असल्यास फॅटमध्ये थोडी वाढ होते. परंतु, खाद्यातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण वाढल्यास पचनक्षमतेवर वाईट परिणाम होऊन दुधातील प्रथिनांमध्ये (प्रोटीन) घट येते. परंतु या उलट सोनाई पशु आहारात स्निगधांश (फॅट) वाढीच्या घटकांबरोबर SNF व प्रथिने (प्रोटीन) वाढीच्या घटकांचा हि समावेश आहे म्हणूनच सोनाई गोळीपेंड हि परिपूर्ण संतुलित आहार आहे.

*टीप* :- १)सोनाई पशु आहार हे परिपूर्ण संतुलित आहार असल्या कारणाने ओल्या व सुक्या चाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणतेही पशु खाद्य जनावरांना देण्याची गरज नाही.
2) सोनाई पशु आहार न भिजवता जनावरांना खायला दयावा.
३)सोनाई पशु आहार जनावराच्या दुधाच्या क्षमतेनुसार खायला दयावा (गाई साठी प्रतिलिटर 350 ग्रॅम व म्हशींकरिता 400 ग्रॅम प्रतिलिटर)

श्री.सुशांत जाधव
7977770281, 7447709200

  • About Us : दूध देणाऱ्या गाई म्हशींसाठी परिपूर्ण आहार, सोनाई पशु आहार
  • Year Of Establishment : 2016
  • Company Name : सोनाई पशु आहार
Contact details

अहमदनगरAhmednagar,Maharashtra,414001  Show Phone Number [email protected]

Contact this listing owner

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Customer Care