वयाच्या 65 वर्ष खचून न जाता अपयशाला न घाबरता या माणसाने उभारली जगातली सगळ्यात प्रसिद्ध फुड चेन…

वयाच्या 65 वर्ष खचून न जाता अपयशाला न घाबरता माझं वय आता घरी रिटायरमेंट चे झालंय आता कुठे व्यवसाय सुरू करणार असा तसूभर सुद्धा विचार न करता या माणसाने उभारली जगातली सगळ्यात प्रसिद्ध फुड चेन…

आपल्याकडे बराच वेळ उद्योजक यश मिळवण्यासाठी धडपडत असतो अनेक वेळा मी उद्योग कोणत्या वयात सुरू करावा या प्रश्नात 35 ते 40 ओलांडली की लोक विचार करतात की हे काय वय आहे का बिझनेस सुरु करण्याचे अशावेळी प्रत्येक माणसाने ही स्टोरी वाचली पाहिजे….

KFC ला घडविणारे कर्नल हारलॅंड सॅन्डर्स यांच्याकडे वयाच्या 65 वर्षी फक्त 99 अमेरिकन डॉलर होते.

कामातून निवृत्ती आणि म्हातारपण या दोन्हीशिवाय त्यांच्याकडे काहीही नव्हतं…

चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

पण महत्त्वाचे म्हणजे ते चविष्ट चिकनची रेसीपी बनवित असतं. त्यांनी बनविलेले चिकन त्यांचे मित्र-परिवार भरपेट खायचे. आपल्या हाताला असलेल्या चवीवर आपण धंदा सुरु करु, असे म्हणत सॅन्डर्स यांनी वयाच्या 65 वर्षे असताना छोटासा व्यवसाय सुरु करण्याचे ठरविले.

बिझनेस सुरु करण्यासाठी सॅन्डर्स यांनी केन्टुकी सोडले. आपली चिकनची रेसीपी घेऊन ते अमेरिकेच्या प्रत्येक राज्यातील हॉटेल्स मालकांना भेटत असतं. आपली एवढी चांगली रेसीपी अनेक रेस्टॉरंट्ट मालकांकडून रिजेक्ट होत असले तरीही ते खचले नाहीत.

😱 *1,009* लोकांनी ही रेसीपी रिजेक्ट केली असल्याचे, ते सांगतात. हो तब्बल एक हजार पेक्षा जास्त वेळा रिजेक्ट झाल्यानंतर सुद्धा ते खचले नाहीत नाही तर आपल्याकडे मराठी माणूस एकदा किंवा फार तर फार दोनदा किंवा तीनदा प्रयत्न करतो आणि हे शक्य नाही जमणारच नाही हे होऊच शकत नाही अशा विचाराने प्रयत्न करणे सोडून देतो..

शेवटी अथक परिश्रमाच्या जोरावर आणि ग्रेग क्रीड आणि रॉजर इटॉन यांच्यामदतीने सॅन्डर्स यांनी सप्टेंबर, 1952मध्ये सॉल्ट लेक सिटी येथे केन्टुकी फ्राईड चिकन अर्थात ‘केएफसी’ची स्थापना केली. आज ‘केएफसी’ फक्त फ्राईड चिकनवर थांबलेले नसून सॅन्डविच, रॅप्स, सॅलॅड्स आणि डेझर्टपर्यंत पोहोचले आहे.

सध्याचा ‘केएफसी’चा पसारा जगभरात वीस हजार पेक्षा अधिक शहरात पोहोचलेला आहे. तर रेव्हेन्यू 23 अब्ज यूएस डॉलर इतका आहे.

आज जरी ते हयात नसले तरी
एका वयोवृद्ध माणसाने फक्त आपल्या रोजगारासाठी चिकन विकण्यास सुरुवात केली होती.. यामुळे आज लाखोलोकांना रोजगार मिळाला आहे. तर कोटींहून अधिक खवय्यांना चिकन खाण्याचा नवा आणि चविष्ट पर्याय मिळाला…

6 thoughts on “वयाच्या 65 वर्ष खचून न जाता अपयशाला न घाबरता या माणसाने उभारली जगातली सगळ्यात प्रसिद्ध फुड चेन…

  1. फार छान अत्यंत कठीण परिस्थितीतून यश निर्माण केले आहे त्यांच्या प्रयत्नांना अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Customer Care