कांडी कोळसा निर्मिती

कांडी कोळसा तयार करणे

प्रकल्पाची ओळख :

       देशापुढे आज इंधन ही समस्या ज्वलंत आहे. इंधन ही समस्या कधीही न सुटणारी समस्या आहे. आजपर्यंत जे या व्यापारात पडले ते मोठे झाले कारण याला बाजारपेठ शोधावी लागत नाही सर्वाकडे गॅस नसतो, रॉकेल मिळत नाही. मिळते तेही पुरात नाही महागही पडते. शहरात सरपण ही मिळत नाही. अशी ही व्यवस्था शहरात राहणार्‍या सामान्य माणसांची असते.
झोपडपट्टीवासीयांची तसेच रोज हातावरचे पोट असणार्‍यांचे हाल याहीपेक्षा जास्त आहे. याला लोकांनी पर्याय शोधला आहे. तो म्हणजे लाकडी भुसा व कोळश्यावर चालणार्‍या शेगड्या,पाणी तापविणे,स्वयंपाक करणे याकरिता त्या उपयोक्त आहेत. महिलांना वैयक्तिकपणे तसेच महिलांच्या बचतगटाला सामुदायीकरित्या करता येण्यासारखा व्यवसाय आहे. हा व्यवसाय महिलाना आपला घरप्रपंच सांभाळून करता येण्यासारखा आहे. आपली राहण्याची जागा तळमजल्यावर असेल व आसपास थोडीशी रिकामी जागा असेल तर महिलांना हा व्यवसाय करण्यास अतिशय फायदेशीर आहे.
इंधनाचा कुठलाही व्यवसाय तोट्यात अथवा मंदीत नाही. मग तो डिझेल पेट्रोलचा असो, गॅसचा असो सरपण कोळ्श्याचा असो. कायम तेजीत चालणार्‍यापैकी तो आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय कराल ठेवढा नफा जास्त मिळू शकतो .

प्रकल्प आराखडा :

  • उत्पादन प्रक्रिया /कार्यप्रक्रिया :

       कांडी कोळसा तयार करण्याचे मशीन बाजारात मिळते ते खरेदी करावे. कांडी कोळसा तयार करण्याकरिता दगडी कोळ्श्याची राख, लाकडी कोळ्श्याची राख, पाला पाचोळा, जळाऊ टाकाऊ वस्तूंचा चुरा, शेण, काळी माती, मिक्स करावी, भिजत घालावी. हे मिश्रण कोळसा तयार करण्याच्या मशीनमध्ये टाकावे . सरळ, गोल आकाराचा अथवा आपण सांडगे घालतो तसा पाहिजे तसा कोळसा तयार करता येतो. दोन-तीन दिवस याला चांगले ऊन दिले कि उत्तम प्रतीचा कोळसा तयार होतो .
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

  • प्रकल्पक्षमता :

       हा प्रकल्प माध्यम स्वरूपाचा असून, या प्रकल्पात एका वर्षात ५.०४ मे. टन इतके कांडी कोळ्श्याचे उत्पादन अपेक्षित आहे.
 

  • बाजारपेठ /संभाव्य ग्राहकवर्ग :

       हा कृत्रिम कांडी कोळसा जळण म्हणून चांगला उपयोगी पडतो. त्यामुळे याला मागणीही भरपूर आहे . याला बाजारपेठ मिळवण्यासाठी झोपडपट्टीत याचा थोडासा प्रचार करावयास हवा. एकदा १०-१५ लोकांना माहीत झाले,कि झपाट्याने प्रसार होतो व आपोआप ग्राहक वाढतात.
महिलांनी तयार केलेला माल विक्री होण्याच्या दृष्टीने बचत गटांमर्फत शासनाच्या मदतीने विक्री केंद्रे सुरू केलेली आहेत. या बचतगटांचे सभासदत्व स्वीकारावे. त्यांना आपल्या व्यवसायाची माहिती द्यावी . महिलांच्या आर्थिक विकासकारिता महाराष्ट्र शासनाने जिल्हा पातळीवर महिला आर्थिक विकास महामंडळे स्थापन केलेली आहेत. या मंडळातील महिलांनाही या व्यवसायाची माहिती द्यावी.
आपला व्यवसाय जर ग्रामीण भागात असेल तर जिल्हा पातळीवर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्द्योग मंडळाची कार्यालये आहेत. या मंडळामार्फत अर्थसहाय्याबरोबर’च ग्रामीण कारंगिरांच्या उत्पादित मालास  बाजारपेठ मिळवून देण्यास मदत केले जाते.
 

व्यवसायास वाव :

       या व्यवसायाबरोबरच सरपण व इतर जळाऊ पदार्थ ,करवंठी कोळसा विक्रीस ठेवला तरी त्याला चांगले ग्राहक आहेत.
 

  • उपलब्ध जागा :

       १००० चौ .फूट आच्छादित /मोकळी जागा .
 

  • उपयुक्तके /मूलभूत सुविधा :

       सिंगल फेज वीज कनेक्शन ,पाणी गरजेनुसार .
 

  • मनुष्यबळ / कर्मचारी वर्ग आवशक्यता :

       उद्योजक स्वत: उत्पादन प्रक्रियेत सहभागी होणार असून ,त्याच्यासह  २ अकुशल कामगार असे एकूण ३ लोक काम करणार आहेत असे गृहीत धरले आहे .
 

७. भांडवलाचा तपशील :

७.१ स्थिर भांडवल :(१महिन्यासाठी ):

अ.क्रतपशीलनगदरएकूण किंमत
१.
 
 
 
२.
३.
 
यंत्रसामग्री व साहित्य :
मिश्रण करण्याचे यंत्र
 
ड्रायर
 
इतर साधने व हत्यारे
 
फर्निचर
पूर्व –उत्पादन खर्च
  


 
 
३२,०००
१८,०००

 


 
 
२२,०००
१८,०००
२,०००
 
४,०००
८,०००
 
एकूण५४,०००

७.२ खेळते भांडवल ( १ महिन्यासाठी ) :

अ) प्रमुख बाबी :

१) कच्चा माल व साहित्य :

अ.क्रतपशीलप्रमाणदर (रु .)एकूण किंमत
१.
२.
३.
 
कोळसा
शेण
पॅकेजिंग साहित्य
४००० कि.ग्रॅ.
२०० कि.ग्रॅ.
१० रु / कि.ग्रॅ.
१ रु / कि.ग्रॅ.
४०,०००
२००
८००
एकूण४१,०००

 

२) मनुष्यबळ /कर्मचारीवर्गावरील खर्च :

अ.क्रतपशीलसंख्याप्रत्येकी दरमहा वेतन (रु )एकूण किंमत (रु )
१.
२.
 
अकुशल
भत्ते व इतर सवलती
(एकूण वेतनाच्या २० %)


 
६,०००

 
१२,०००
२,४००
 
एकूण१४,४००

ब) एकूण खेळते भांडवल (१ महिन्यासाठी ) :

अ.क्रतपशीलनगदरएकूण किंमत
१.
२.
३.
४.
 
 
६.
७.
८.
कच्चा माल व साहित्य
कर्मचारीवर्गावरील खर्च
देखभाल –दुरूस्ती
मूलभूत सुविधा
०१. वीज
०२. पाणी
प्रशासकीय खर्च
जाहिरात
जागा भाडे 
६०० यूनिट


 
८ रु. /यूनिट४१,०००
१४,४००
६००
 
४,८००
६००
२,०००
१,०००
२,०००
६६,४००

 
८. भांडवलाची उभारणी :

अ.क्रतपशीलरक्कम (रु .)अ.क्रतपशीलरक्कम (रु .)
१.
२.
 
स्थिर भांडवल
खेळते भांडवल
 
 
 
एकूण
५४,०००
६६,४००
१.
 
२.
 
स्वत:चे भाग भांडवल
(२५ %)
अपेक्षित बँक कर्ज
(७५ %)
 
एकूण
३०,१००
 
९०,३००
 
 
,२०,४००,२०,४००

 
९. नफा –तोता पत्रक (वार्षिक ) :
अ ) एकूण उत्पन्न :

अ.क्रउत्पन्नाच्या बाबीवार्षिक उत्पन्नाचा तपशीलएकूण उत्पन्न
१.
 
 
कांडी कोळसा विक्री .२० रु /कि.ग्रॅ. दराने दरमहा ४२०० कि.ग्रॅ. = ८४,००० रु .दरमहा ८४,००० रु X १२ महीने१०,०८,०००
एकूण१०,०८,०००

 
ब ) एकूण खर्च रुपये (वार्षिक ) :

अ.क्रतपशीलखर्च (रु )
१.
२.
 
 
३.
४.
खेळते भांडवल
घसरा :
१.       यंत्र सामग्री व साहित्य (२० %)
२.       फर्निचर (१५ %)
विमा (विक्रीवर २ %)
बँक कर्जावरील व्याज
७,९६,८००
 
८,४००
६००
२०,१६०
९,०३०
 
एकूण८,३४,९९०

 
८. निव्वळ उत्पन्न रुपये :
= स्थूल उत्पन्न – एकूण खर्च- मुद्दल हप्ता
= १०,०८,००० – ८,३४,९९० – ६३,३००
= १,०९,७१० रु.
९. ना नफा ना तोता बिन्दु :
 
निश्चित खर्च X १००           ८,३४,९९० X १००
————————————-  = ——————————–    =    ८८ %
निश्चित खर्च + निव्वळ नफा       ८,३४,९९० + १,०९,७१०
 
 
 
 
 

January 11, 2018

1 responses on "कांडी कोळसा निर्मिती"

  1. I want to start this business please help me

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »