यशस्वी उद्योजक व्हा…..!!!

यशस्वी उद्योजक व्हा…..!!!
कधी नव्हे इतके उत्तम वातावरण आज स्वत:चे व्यवसाय सुरु करण्यासाठी तयार झालेले आहे. छोट्या छोट्या निर्यातीसाठी उपयुक्त अगदी सॉफ्टवेअर पासून तर दैनंदिन वापरातील उपयुक्त वस्तुंपर्यंत अनेक व्यवसाय उपलब्ध आहेत. सर्वच उत्पादक उत्पादक उद्योगांसाठी मागणी दिवसेंदिवस वाढते आहे. तज्ज्ञांच्या मते, येणारी अनेक वर्षे उत्पादक कामासा फारच पोषक ठरणार आहेत. थोडक्यात, उद्योजकांसाठी हा सुगीचा काळ आहे. वित्त पुरवठाही सुलभतेने उपलब्ध होतो आहे. सरकारी धोरणेही उत्साहवर्धक आहेत. भारतातील विविध थरातील उद्योजकांनी २०२० पर्यंत जगातील श्रींमत देशांच्या यादीत आपला समावेश करण्याचा चंगच बाधला आहे. हे स्वप्न साकार करायचे असेल तर जास्तीत जास्त लोकांनी उद्योजक व्हायला हवे… योग्य विचार आणि कृती ह्यांचा समन्वय झाल्यास ही सहजसाध्य गोष्ट आहे. पुढील काही विचार उद्योजक बनण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
 

 

  • शक्यातांचा अभ्यास :-

आपण कोणत्या गोष्टी करू शकतो. ह्या संबंधीच्या सर्व कल्पना गोळा करा. अशा सर्व गोष्टींची यादी करणे सोईस्कर ठरेल. त्यावर विचार करा. अनेक गोष्टींचा विचार झाल्यावर कोणता व्यवसाय आपण करू शकू. त्याबद्दलच्या  शक्याता निवडा या कल्पना कशा अमलात आणता येतील. ह्यावर लक्ष केंद्रित करा. दोन किंवा तीन कल्पनांसंबधी सर्व प्रकारची माहिती आणि त्या अमंलात आणण्यासाठी लागणारा बारीकसारीक तपशील गोळा करा.
 
 

 

  • योजना करा :-

योग्य योजना न करता एखादी गोष्ट अभावानेच साध्य होते, गीतरामायाणातील सुग्रीवाने केलेल्या आततायी कामाबद्दल श्रीरामांनी सौम्य शब्दांत तयाची कानउघडणी केली तर आजही आपल्याला मार्गदर्शक आहे. कोणतही गोष्टी करण्यापूर्वी काय करायचे, केव्हा करायचे, कसे करायचे आणि कुणी करायचे हे ठरवणे आवश्यक आहे. निर्णय घेण्यापूर्वी कामाचा अभ्यास, कामाची  वाटणी कशी करावी, काम पूर्ण कसे करता येईल, कोण करील आणि प्रत्यक्षात ते कसे उतरेल, या गोष्टींना योजना म्हणतात.औद्योगि भाषेत याला समग्र योजना अहवाल असे म्हणतात.
 
 

  • स्वयंप्रेरणेने पुढाकार घेत कार्य कर :-

स्वत:चा व्यवसा करायचा म्हण्जे कुणीतरी टकलल्याशिवाय उडी मारायची नाही असा दृष्टीकोन ठेवून चालणार नाही. जे काही करावयाचे आहे त्यात स्वत:चा पुढाकार हवा. काम हे  भावनेपेक्षाही विचारांनी करावयास हवे. संधीची वाट पाहात बसलो तर संधी मिळणार नाही. जे संधीवर झडप घालतात. त्यांनाच संधी वरमाला घालते. म्हणजेच जागृत राहून सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवाती, ज्या गोष्टी आपल्याला घालते. ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यांनी संपूर्ण जबाबदारी घेऊन तशा त्या घडवून आणल्या, तरच आपण आपल्या योजना साकार करू शकतो.
 

  • ध्यास घ्या :-

जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी देव वसाला आहे असे म्हणतात. तसेच प्रत्येक गोष्ट करताना आपलयाला करावयाच्या उद्योगाचा ध्यास लागायला हवा. म्हणजे आपल्याला जे मिळवायचे आहे त्यासाठी Passion निर्माण व्हायला हवी. उद्योजक बनणे. ही २४ तासांची कामगिरी आहे. हा चोवीस तासांचा उद्योग आहे, धडपड आहे. आपण जो व्यवसाय करतो त्यावर जर आपले प्रेम नेसल, त्यासाठी जर आपण  ध्यास घेतला नाही तर यशप्राप्ती जर कठीणच होते. ध्यास तयार करण्यासाठी नसतो त्यामुळेच तो विकत मिळत नाही, ध्यास मनाच्या आत कुठेतरी तयार होतो. तो स्त्रोत पकडता यायला हवा. ध्यास नसला तर यश मिळत नाही. असे मात्र नाही ह ! परंतु कोणत्याही इतर संबंधांप्रमाणे उद्योग करण्याचा ध्यास असला तर आपल्या कामात वेगळीच मजा येते. ह्यात काही काळ जातो; आपण जर चेतवले गेले, उद्दीपित झालो तर हा काळ आपण परत मिळवू शकतो.
 

 
उद्योगाला सुरुवात करताना आपण ही गोष्ट इतरांजवळ बोलतो तेव्हा आपल्याला बऱ्याच नकारघंटा ऐकायला मिळतील. सर्वसामान्य माणूस त्या एकून उद्योगाचा विचारच सोडून देतो. यशस्वी उद्योजकांनी मात्र नकारघंटाटांकडे कानाडोळा केलेला दिसतो. परंतु हे कसे करायचे ? नाही, ह्या संकल्पनेच्या पलीकडे जायचे. नकार हे एक आव्हान म्हणून स्वीकारवायचे. हे सर्व बाबतीतच सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारायचा. अनेक अभ्यासपहाण्यांतून सकारात्मक दृष्टीकोन असणारे उद्योजक हे इतरांपेक्षा अधिक यशस्वी झालेले दिसतात, असे आढळून आले आहे. ह्याचा अर्थ वास्तवापासून दूर रहा असा नाही. खुशालचेंडूचे जीवन जगा असाही नाही. तर येणाऱ्या परिस्थितीला हसत सामोरे जात अवघड, कठीण गोष्टींवर मात करा. ह्या दृष्टीकोनामुळे प्रतिकूल परिस्थितीचा उत्तम सामाना करता येतो.
 

 
 

  • सातत्य :-

सातत्याच्या स्पष्टीकरणासाठी एक उत्तम उदाहरण डोळ्यापुढे येते. खडक हा सृष्टीतल्या सर्वात कठीण पदार्थांपैकी एक आहे. पाणी हे मात्र जगातल्या सर्वात मऊ पदार्थांत मोडते. आपण नदीतल्या खडकांकडे कधी बारकाईने पाहिले आहे ? अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात सातत्याने खोल खड्डे पडलेले दिसतील. लक्षात आला का सातत्याचा परिणाम ? तसेच उद्योजक बनताना अनेक अडचणी येतील. कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. परंतु, आपल्या प्रयत्नात पाण्याच्या प्रवाहासारखे सातत्य असेल तर कठीण परिस्थिती आपल्या पुढे टिकाव धरू शकणार नाही. तिच्यावर आपण यशस्वीपणे मात करू शकू. यशस्वी उद्योजकांपुढे अडचणी आल्याच नाहीत असे नाही, तर प्रयत्नांच्या सातत्यामुळे अनेक अडचणी पार करीत हवे ते यश त्यांनी मिळवले.
आपण सर्वांना परिचित, विजेचा संशोधक थॉमस एडिसन ह्यांचे उदाहरण देण्याचा मोह टाळता येत नाही. विजेचा दिवा तयार करण्यात त्यांना यश मिळालं खरं पण त्याआधी हजारो अयशस्वी प्रयोगांना ते सामोरे गेले होते. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांच्या कारखान्याला आग लागली होती. लक्षावधी डॉलर्सची मालमत्ता जळून खाक झाली. त्यावेळी ह्या जिद्दी  संशोधकाच्या तोंडून, ‘विनाशसुध्दा मोठा मौल्यवान असतो.’ त्यात आपल्या सर्व चुका भस्मसात होतात. देवाचे आभार मानले पाहिजे कारण आता आपण नव्याने सुरुवात करू शकू.’’  केवढा प्रचंड सकारातमक दृष्टीकोन ! ह्या मोठमोठ्यांना हताश करणाऱ्या घटनेनंतर वळ तीन आठवड्यातच त्यांनी ग्रामोफोनचा  शोध लावला आणि त्याचे यशस्वी उत्पादन सुरु केले. केवढी प्रचंड धडाडी आणि वास्तव वाटचाल !
 

February 7, 2017

1 responses on "यशस्वी उद्योजक व्हा…..!!!"

  1. शेतकऱ्यांना एक चांगली संधी मिळत आहे …. त्या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न करीन….. धन्यवाद ….

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »
error: Content is protected !!