आयुष्याच्या या वळणावर नव्याने उभारी घेतोय तेही सेंद्रिय शेती मध्ये करिअरची पुन्हा सुरुवात करून…

👨🏻‍🌾 एका कृषी पदवीधर ध्येयवेड्या तरुणाची कहाणी..👨🏻‍🌾

आज आम्ही तुम्हाला एका आगळ्यावेगळ्या नव उद्योजकाची स्टोरी सांगणार आहोत…

अहमदनगरच्या पाथर्डी सारख्या दुष्काळी भागातून आलेला राहुल कांबळे..

👣शेतकऱ्याचा मुलगा असल्याने काही तरी या क्षेत्रात करिअर करता येईल म्हणून बीएससी ऍग्री ला ऍडमिशन घेतले खरे मात्र त्यानंतर प्रवाहानुसार शेतीमध्ये करिअर न करता बँकेमध्ये नोकरी पत्करली कित्येक वर्ष फायनान्स लोन क्रेडिट-डेबिट हे सगळं केल्यावर आता मात्र घरची आस लागु लागली….🌳

🤔आपण नक्की ॲग्री चे शिक्षण घेतले कशासाठी ? त्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि मधल्या काळात फक्त आपण स्वतःचे पोट भरण्यापुरता च विचार करत आलो आता मात्र बस करायचे आपण आपला मूळ उद्देश या वरती काम सुरु करायचे या ध्येयाने चक्क एका मोठ्या मल्टिनॅशनल बँकेतली नोकरी सोडून दिली..

आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी काही करता येईल का ? यावर अभ्यास सुरू केला अभ्यासाअंती लक्षात आले की ☘ रासायनिक खतांचा शेतीत वापर आणि त्यामुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान ☘ ही सध्याची मोठी अडचण मांडली आहे यावरती भविष्याचा विचार करून आत्तापासूनच आपण सेंद्रिय शेतीचा अभ्यास केला पाहिजे शेतीमध्ये सेंद्रिय खत वापर सुरू केला पाहिजे…

मग सेंद्रिय खते या विषयावरती अभ्यास सुरू झाला लक्षात आले की मार्केटमध्ये अनेक कंपन्या अनेक दिवसांपासून कार्यरत आहेत आणि किंबहुना शेतकऱ्यांचा विकास करण्यापेक्षा अनेक कंपन्या या निकृष्ट दर्जाचे प्रॉडक्ट देण्यात व्यस्त आहेत..🤬

त्यातून राहुलला लक्षात आले की ; जर खरोखर शेतकऱ्यांचा विकास करायचं असेल तर उत्तम क्वालिटीची खते जर आपण शेतकऱ्यांना देऊ केली त्यांचा उत्पादन खर्च कमी केला जमिनीचा होणारा ऱ्हास जर थांबवला त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल..

पण हे सगळे करायचे कसे कारण त्यासाठी भरपूर गोष्टींची आवश्यकता होती मग सुरुवातीला कोणीतरी एखादा पाठीराखा हवा की ज्याचा या क्षेत्रातील दांडगा अभ्यास आहे..
आणि अचानक एक दिवस अगोदर च्या फायनान्स सेक्टर मधला मित्र नितीन सोनवणे याची भेट झाली आणि त्याच्या माध्यमातूनच राहुलला खेतीवालो ऑर्गानिक्स या कंपनीची ओळख झाली…

कंपनीच्या प्रॉडक्टचा मालक भुषण छाजेड सर यांच्या विषयी अभ्यास केल्यावर राहुल ला लक्षात आले की ; जो उद्देश मी घेऊन मी काम करीत आहे त्या सारखाच विचार भूषण सर सध्या शेतकऱ्यांसाठी करत आहेत मग स्वतःचे काही करण्यापेक्षा खेती वालो परिवाराला जोडले जाऊन राहुल ने अहमदनगर मधून सेंद्रिय शेती चा प्रचार आणि प्रसार चालू केला…

👍🏻 सध्या अनेक शेतकरी सेंद्रिय शेती करण्यास उत्सुक आहेत अडचण आहे ती योग्य मार्गदर्शन सल्ल्याची आणि पुढे तयार झालेल्या मालाच्या विक्रीची..😇

🥦 राहुल शेतकर्‍यांच्या या सर्व अडचणी दूर करीत थेट सेंद्रिय शेतीबाबत बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याचे धोरण आखले आहेत…🌱
🚀इतकेच नाही तर तयार झालेला माल कुठे विकायचा ,अगदी परदेशात कसा पाठवायचा हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहे..✈

सेंद्रिय शेतीची ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात उभी राहावी आणि आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा व्हावा या ध्येयाने प्रेरित झालेल्या या तरुणाला चावडी परिवाराचा मानाचा मुजरा…

तुम्हीसुद्धा राहुल शी कनेक्ट होण्यास इच्छुक असेल तर त्यास 09834243494 नंबर वर संपर्क साधा..

धन्यवाद

3 thoughts on “आयुष्याच्या या वळणावर नव्याने उभारी घेतोय तेही सेंद्रिय शेती मध्ये करिअरची पुन्हा सुरुवात करून…

  1. मी सुध्दा सेंद्रिय शेती साठी सद्या ध्यास घेतला आहे.आपले अनमोल मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा करतो.माझा मो.नं.7020674336

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Customer Care