अगरबत्ती उद्योग…

        अगरबत्ती उद्योग…

घरामध्ये कोणताही धार्मिक प्रसंग असला की कापूर, उदबत्ती, निरांजन यांना अपार महत्व असते अगदी रोजच्या देवपूजेच्या वेळीही उदबत्तीच्या सुवासाने, घरात पावित्र्याचं आणि मांगल्याचं वातावरण निर्माण होतं गरीब असो की, श्रींमत, उच्च असो की नीच, प्रत्येकालाच उदबत्तीची माहिती आहे. त्यामुळे उदबत्तीची मागणी कधीही न संपणारी असल्यामुळे एक लघुउद्योग म्हणून अगरबत्ती दररोज विकसित होत असलेला उदयोग आहे.

उदयोग

     अगरबत्ती उदयोगासाठी लागणारा कच्चा माल कोणत्याही स्थानिक बाजारपेठेतून वर्षभर स्वस्त किंमतीत उपलब्ध होत असतो.  या उदयोगासाठी सुवासिक लाकूड, मुळ्या, साली, पाने, चंदन, अगरू, कोळसा, लवंग, दालाचिनी, निलगिरी, गुलाब, चाड:गा, मोगरा, चमेली, रातराणी, अर्क, धूप, कापूर, केवडा, कंकोळ, तुळस, अटामसी, मरवा, नागरमोथे, बुक्का, भाताचे तूस, व्हाईट ऑईल, ग्रीस, लुबिकेटिंग ऑईल, सोरा डिंक, गोंद खळ, स्टार्च बांबू किंवा वेळूच्या कामट्या आदी कच्चा माल अगरबत्ती तयार करण्यासाठी लागतो.  हा उदयोग महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ राज्यासह विविध ठिकाणी अगरबत्ती लघु उदयोगाची निर्मिती होत आहे.

बाजारपेठ

अगरबत्तीच्या उद्योगात भारत जगात अग्रगण्य मानला जातो. भारताच्या अगरबत्या ८५ देशांत निर्यात केल्या जातात. अमेरिका, युरोप, केनिया, मलाया, अरब देश आदी ठिकाणी भारतात तयार होणाऱ्या अगरबत्ती मोठया प्रमाणत निर्यात केली जाते.  तसेच विविध ठिकाणी अगरबत्तीसाठी दररोज मागणी वाढत आहे. त्यामुळे या उदयोगासाठी एक मोठी अशी बाजारपेठे सर्वत्र उपलब्ध आहे.

प्रकल्प विषय

      या उदयोगासाठी साधारण  ७० ते ८० हजार रूपया पर्यंत खर्च येऊ शकतो. उदयोग सुरु केल्यानंतर खर्च कमी अधिक होऊ शकतो. या उदयोगसाठी बँक आपली योग्य पत पाहून कर्ज पुरवठा करते. हा लघुउदयोग केल्यामुळे आपला आधिक फायदा होऊ शकतो.

अधिक माहितीसाठी संपर्क –

7249856424

December 13, 2016

0 responses on "अगरबत्ती उद्योग..."

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »