एक लघुउद्योग दंतमंजन……!

एक लघुउद्योग दंतमंजन……!
प्रत्येक माणसाला सकाळी झोपुन उठल्या बरोबर रोजच लागणारे एक अत्यावश्यक दैनंदीन गरजेचे उत्पादन म्हणजेच दंतमजंन. दंतमंजन म्हटले की, आपल्या डोळ्या समोर चटकन येतात ती उत्पादन म्हणज जसे कोलगेट, विको वज्रंदंत. प्रत्येक घराघरात पाहोचलेले व तेवढीच ब्रँडेड असलेली उत्पादने आहेत. पेस्ट स्वरूपात व पाडर स्वरूपात अशा दोन प्रकारात दंतमंजन बाजरात उपलब्ध असतात.
पेस्ट स्वरूपातील दंतमंजन बनविण्या करिता भांडवली खर्च जास्त येतो. पण पारंपारिक पध्दतीचे चूर्ण स्वरूपातील मंजन बनविण्यासाठी जास्त खर्च येत नाही. आयुर्वेदीक व नेसर्गिक उत्पादन  वापरण्याकडे माणसांचा काल वाढल्याने बाजारात मागणीही भरपुर आहे. महीला व पुरूषांना घर बसल्या करता येण्यासारखा हा गुहउद्योग व लघुउद्योग आहे.

      उद्योग –     
हा उद्योग आपणांस गुहउद्योग तसेच बचत गटामार्फत सुध्दा हा लघु उद्योग आपणांस करता येतो. या उद्योगासाठी लाकडी कोळसा, मीठ, तुरटी, निलगीरी तेल, हिरडा इत्यादी. मिक्सर आदीसह विविध साहित्य लागते. कोळसा खडा स्वरूपात खरेदी केला असेल तर सर्वप्रथम त्याची मिक्सरमध्ये भूकटी पावडर करून घ्यावी. मीठ व तुरटीचेही बारीक मिश्रण करून घ्यावे. त्यावर योग्या त्या प्रक्रिया केल्यावर त्यापासून आपणांस चांगले असे दंत मंजन तयार करता येते. या दंतमंजनामध्ये निलगीरीचे तेल, तुरटी मीट असलेने दातांना दुर्गंधी येत नाही व दात कीडत नाहीत कारण हे पदार्थ जंतुनाशक असतात.  त्यामुळे त्याचा उपयोग प्रमुख्याने दातांची निगा राखण्यासाठी केला जातो. तसेच हा उद्योग आपणांस सहजा सहजी करता येण्यासारख्या उद्योग आहे.
[huge_it_slider id=”1″]
          बाजारपेठ  :-
आपले उत्पादन उत्तम दर्जाच्या जोरावर आपण आपला माल टिकु शकतो. मालाला क्वालिटी असेल तर बाजारातील त्यांच्या उत्तम दर्जोच्या जोरावरच टिकु शकते. याकरीता बाजारामध्ये असणाऱ्या इतर दंतमंजनाचा अभ्यास करा व एक उत्कृष्ट  फॉम्युला बनवा आणि उत्तम  प्रतिचे दंतमंजन तयार करून आपणांस विक्रीस आणून आपल्या मालास चांगला प्रकारे बाजारपेठ तयार करता येते. मालाला क्वालिटी असेल तर बाजरातील स्पर्धेची  भीती  आपणांस राहत नाही. पारंपारिक दंतंजन करीता सर्वोत्तम बाजारपेठ म्हणजे घरोघरी जावुन डोअर मार्केटीं करून आपल्या मालास बाजारपेठ तयार करता येते. जर आपल्या मालाची क्वालिटी चांगली असेल तर जो  व्यक्ती आपला माला खरेदी करेल ता आपला कायमचा ग्राहक तयार होऊ शकतो. तसेच आपला माला हा ठोक व्यापारी, किरकोळ दुकानदार, स्टेशनरी, किराणा दुकान, मेडिकल, ग्राहक भांडर आदी सह विविध ठिकाणी आपला माला विक्रीस ठेवता येतो. तसेच या दंतमंजनाची आपणास डोअर टु डोअर मार्केटिंग करता येते.
          प्रकल्प विषय :-
हा उद्योग उभारणीसाठी साधारण ५० ते ७० हजार रूपये  खर्च येतो. उद्योग सुरू झाल्यास खर्च कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. हा उद्योग सुरू करण्यासाठी बँके आपली पत पाहून आपणांस कर्ज पुरवठा करते. तसेच हा उद्योग सुरु केल्यास आपणांस चांगला अर्थिक फायदा होऊ शकतो. व आपणा एक चांगले यशस्वी असे उद्योजक बनू शकतो.

January 27, 2017

1 responses on "एक लघुउद्योग दंतमंजन......!"

  1. सर मै मध्यप्रदेश से हू।मै घर से उदर विकार पाचक चूर्ण दंतमंजन बनाकर लूज पैक मे बेचता हू।इसे बढ़ाना चाहते है ।क्या करे क्या कोई लाइसेंस जरूरी होगा ?लघु उद्योग की तरह काम करना है।कृपया मार्गदर्शन प्रदान करे ।

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »