
Pani Puri! नाव ऐकले तरी जिभेला पाणी सुटते ना …. पाणीपुरी खायला कोणाला नाही आवडणार… चविष्ट आणि मनाला भावणारी ही पाणीपुरी अस्वच्छतेसाठी तितकीच फेमस आहे. कुठलं पाणी आणि कुठल्यातरी झोपडपट्टीत बनवलेल्या पु-यांमुळे पाणीपुरी खाऊन पोटाचे विकारही होतात. तरीसुद्धा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांची विक्री केली जाते…
ही गोष्ट आहे प्रशांत कुलकर्णी यांची.
इन्फोसिस’मध्ये कार्यरत असताना प्रशांतने एकदा पाणीपुरी खाली आणि ती त्याला बाधली. कारण फूड पॉईझन. पुढचे काही महिने तो अंथरुणावरच खिळून होता. एवढ्या दिवसात त्याचे चटपटीत खाणे ही लांबच होते.आपली खाण्याची हौस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती अशावेळी त्याच्या डोक्यात संकल्पना आली ती हायजिनिक स्वच्छ पाणीपुरीची….
बिझनेसची कल्पना तर डोक्यात आली आता तो कसा करावा यासाठी प्रशांतने रिसर्च सुरू केला. भारतातील या सुप्रसिद्ध खाद्याचा दुर्दैवाने सध्या तरी पाणीपुरीचा कोणताही ब्रॅड अस्तित्वात नाही म्हणून प्रशांत यात ब्रॅंड स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला गपागप या संकल्पनेवर आधारित ऑक्टोबर 2011 साली त्याने ‘चटर पटर’ नावाअंतर्गत पाणीपुरीचा ब्रॅंड स्थापन केला.
चटर पटर ची सुरुवात इंदूर मधुन झाली मात्र आता अनेक राज्यात हा ब्रँड विस्तारत आहे..
आता ‘चटर पटर’ एक नावाजलेले स्टार्टअप म्हणून प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्याकडे 112 प्रकारच्या पाणीपुरीसहीत 80 प्रकारच्या भेळ आणि 27 प्रकारचे चाट्स उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी बिग बझारशी टायअप केले असून त्यांच्या फ्रॅन्चायझी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानभर पसरल्या आहेत.
प्रशांत आपल्या ‘चटर पटर’ बद्दल सांगतात, ‘भारतीय बाजारात नाव कमविल्यानंतर आम्हाला ‘चटर पटर’ हा ब्रॅन्ड आंतरराष्ट्रीय बाजारात न्यायचा आहे. यासाठी त्यांच्याकडे ऑस्ट्रेलिया आणि लंडनमधून काही प्रपोझल्स आली आहेत.’’ प्रशांत त्यावेळी आजारी पडला पण त्यातूनही त्याने शिकून पुढे उद्योजक बनला. एक छोटीशी कल्पना किती मोठे काम करु शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजेे चटर पटर…
उदयोगाची खूप छान भरारी आहे शेवटी अभ्यासपूर्ण मेहनत आहे .