घेऊन गेला '50 रूपये' आता झाला 10 हजार कोटीचा मालक'…!!!

घेऊन गेला ’50 रूपये’ आता झाला 10 हजार कोटीचा मालक’…!!!
केरळ मधील पालघाट येथील एका शेतकरी कुटूंबामध्ये या व्यक्तीचा जन्म झाला. त्यांच्या वडिलाच्या निधना नंतर तो घरमधुन बाहेर पडला, मात्र त्याच्या खिश्यात त्यावेळेस फक्त ५० रूपये होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण सुध्दा अर्धवट राहिले. आज कमीत कमी ४० दशकानंतर तो  आत तब्बल १० हजार कोटीच्या (कमीत कमीत कमी १५० करोड डॉलर) व्यवसायाचा तो मालक झाला. अहो, हि गोष्ट आहे, शोभा डेवलपर्स चे चेअरमन पी.एन.सी.मेनन यांची. फोर्ब्स यांनी जाहिर केलेल्या अरब देशामधील श्रीमंत व्यक्तीच्या यादी मध्ये त्यांचा सहावा क्रमांकाचा तो भारतीय एक आहे. हे मेनन कोरडपती कसे झाले यांच्या आयुष्याचा प्रवास आम्ही तुम्हाला सांगत आहे.
  ग्रेजुएट सुध्दा नाही मेनन :-
मेनन जेव्हा १० वर्षांचे होते तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घरामधील व्यवसाय संभाळणारा कोणताही व्यक्ती त्यांच्या घरामध्ये नव्हता. कारण मेनन यांच्या आजोबा हे अशिक्षत होते. तसेच त्याची आई अनेक दिवसापासून आजारी होती. त्यामुळे त्यांना शाळेतील शिक्षणच पूर्ण करावे लागले. मात्र त्यानंतर त्यांना पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांना  घेता आले नाही. फोर्ब्स या नामांकित साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखती मध्ये त्यांनी सांगितले की, त्यांना दोन वेळेस बी-कॉम चे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही.
ब्रनेईचा सुलतान महालाचे डिजाइन  :-            
           मेनन यांनी सर्वात प्रथम ब्रुनई चे सुल्तान यांच्या घराचे डिजाईन केले. इन्फोसिस कंपनीचे फाउडर नारायण मूर्ती यांनी बेंगलोंर मधील विविध ठिकाणाचे काम त्यांनी केले. या व्यतिरिक्त यूएई मधील सर्वात मोठ्या इमारतीचे डिजाईन मेनन यांनी तयार केले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेनन यांच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नाही.
   १० हजार कोटीचा मालक :-
सुरूवातीच्या काळात मोठ्या अडचणींचा सामना मेनन यांना करावा लागला. त्यांनी हळूहळू आपला व्यवसाय संपूर्ण अरब देशामध्ये पसरवण्यास सुरुवात केली. ओमनच्या व्यतिरिक्त मेनन ने भारतामध्ये व्यवसायास सुरूवात केली. त्यांनी शोभा डेवलपर्स नावाच्या कंपनीची स्थापना केली.  ही कंपनी मध्ये १२ राज्यामध्ये सुरु असून त्यांची संपत्ती (१५० करोड डॉलर) १० हजार करोड इतकी आहे.
 
अर्धी संपत्ती केली दान  :-
सन २०१३ मधील पीएनसी त्यांची एकून संपत्ती ४७.५ करोड डॉलर असून त्यापैकी अर्धी संपत्ती चैरिटेबल ट्रस्टला दान करण्याची घोषणा केली आहे. त्या सोबतच त्यांनी केरळ मधील चार गाव दत्तक घेतली केला आहे.
अशी केली सुरुवात  :-
मेनन यांचे प्राथिमक शिक्षण केरळ मधील त्रिसूर मध्ये झाले. १९७६ मध्ये त्यांची भेट ओमन यांच्या सोबत झाली. सुरूवातीला ब्रिगेडियर सुलमान हे मासे पकडण्यासाठी लागाणारी बोट खरेदी करण्यासाठी ते भारतात मध्ये आले. सुलेमान यांनी मेनन यांच्या सोबत व्यवसाय करण्याचा निश्चय केला. त्यावेळेस मेमन यांनी पाहिल्यास वेळेस ओमान असे नाव ऐकले होते.
फक्त 50 रूपये घेऊन निघाले होते मेनन :-
       दोन महिन्यामध्ये त्यांनी आपला पासपोर्ट बनवला आणि ओमन जाण्याची त्यांनी संपूर्ण तयारी केली. त्यावेळेस ओमानला जाण्यासाठी फक्त ५० रूपये होते. पण ओमानला जाण्यासाठी भारतीयांना तेव्हा फक्त ५० रूपये लागत असे. तसेच ओमनला जाण्यासाठी मेनन हे खूप उत्साही होते. तसेच त्यांना विश्वास सुध्दा होता की  मी ओमानला गेल्यावर काहींना काही काम सुरु करता येईल.
कर्ज घेऊन अरब मध्ये सुरु केला व्यवसाय :-
त्या वेळेस अरब मधील लोक हे मोठे श्रींमत आहे, असे मेनन यांनी कोठे तरी ऐकले होते. मात्र ओमन मध्ये जेव्हा मेनन पोहचले तेव्हा सगळे चित्र त्यांना उलटे दिसले. ज्या सुलेमाननी मेननला व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न दाखवले, मात्र तो एक मध्यम वर्गीय कुटुंबामधून असल्यामुळे त्यांच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारा पैसा देखील उपलब्ध नव्हाता. नंतर दोघांनी एकत्र येऊन अरब मधील एका बॅके मधून ३००० रियालचे कर्ज त्यांनी घेतले. मेननने सुरुवातीला सुलेमान सोबत इंटीरियर डेकोरेशनचे काम त्यांनी सुरु केले. सुरुवातीच्या काळा मध्ये त्यांना मोठया स्वरूपाच्या अडचणींचा समाना करावा लागला.
पाच वर्षांनंतर बनले अरबचे टॉप व्यवसायिक :-
पाच वर्षांच्या मोठया अडचणींचा सामना करून १९८४ मध्ये मेनन ओमान मध्ये टॉप चार व्यवसायिकांमध्ये गणले जाऊ लागले. १९८६ – ८७ मध्ये ‘ द सर्विस एंड ट्रेड ग्रुप ऑफ कंपनीज ’ यात ओमानच्या कंपनीचा समावेश होऊ लागला. ही कंपनी आता सुध्दा ओमानच्या बाजारा मध्ये टॉपला ही कंपनी आहे. मेनन २००७-०८ मध्ये फोर्ब्सने प्रकाशित केलेल्या बिलेनियार यांच्या लिस्ट मध्ये सुध्दा या कंपनीचा समावेश आहे. मेनन यांची एकून संपत्ती १.२५ अरब डॉलर ऐवढी असल्याचे सांगितले.
पत्नीच्या नावावर सुरु केली शोभा डेवलपर्स :-
भारतामध्ये मेनन यांनी आपल्या पत्नी शोभाच्या नावावर ‘शोभा डेवलपर्स’ या कंपनीची सुरुवात केली. आपल्या पत्नीच्या नावावर कंपनी सुरु करण्यामागे त्यांचा एक हेतू होता. की, त्यांची पत्नी  त्यांच्यासाठी खूप भाग्यशाली आहे. कारण ज्या वेळेस त्यांचे लग्न झाले. त्यावेळेस मेनन हे आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊन एक उत्तम व्यवसायिक तयार झाले होते. भारतामध्ये शोभा डेवलपर्सचे प्रकल्प सुमारे १२ राज्यामध्ये सुरु आहे. शोभा डेवलपर्स २००६ मध्ये मुंबई शेयर बाजारा मध्ये त्यांनी आपले स्थान तयार केले.   मेनन यांच्या कंपनीचे  जवळपास सर्वत्र २,८०० पेक्षा  जास्त कर्मचारी आहे. मेनन हे शोभा रियल्टीचे अध्यक्ष आहे.
 
    समाजसेवाला सुध्दा जोडले आहे, मेनन :-
मेनन हे समाजसेवेमध्ये मोठ्या प्रमाणात जोडले गेले आहे. केरळ मधील किजाकेंचरी या गांवामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा, सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल आणि फाइव स्टार वृध्दा आश्रम मेनन यांनी स्थापन केले आहे. त्यांच्या हॉस्पिटल मध्ये गेल्या सात वर्षापासून ३००० हजार पेक्षा जास्त कुटुंबांनी त्यांचा लाभ घेतला आहे. कंपनीच्या सहकार्यामुळे सी.एस.आर प्रोजेक्टच्या अंतर्गत  त्यांनी कमीत कमी २५०० गरीब कुटुंब दत्तक घेतली आहे. या कुटुंबना जेवन, शिक्षण, निवारा, मुलींचे लग्न व वृध्दा लोकांसाठी आश्रमांची त्यांनी सुविधा सुरु केली आहे.
 भारतामध्ये सुरु करणार शिक्षण संस्था :-
मेनन यांनी भारता मध्ये  गरिब मुलांसाठी शिक्षण संस्था सुरु करण्यासाठी ते खुप प्रयत्न करत आहे. त्यांचे म्हणने आहे की, मी खुप मोठ्या प्रमाणात पैसा कमविला आहे. सर्व पैसा हा माझा कुटुंबावर खर्च केला नाही. मात्र त्यातीन एक हिस्सा हा समाजातील गरीब घटकांसाठी त्यांचा वापर करणार असल्याचे ते म्हणाले.

January 5, 2017

0 responses on "घेऊन गेला '50 रूपये' आता झाला 10 हजार कोटीचा मालक'…!!!"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!