व्यावसायिक उत्तम वातावरण निर्मिती

“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

     व्यवसायामध्ये उत्तम प्रकारचे काम करण्यासाठी वातावरण कसे निर्माण केले पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

     व्यवसाय सुरू करण्याआधी व्यवसायाचे व्यवस्थापन म्हणजे काय ? व्यवसाय कसा करायचा ? व्यवसायासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टींचा अभ्यास करून घेऊन त्यानंतर व्यवसायाचे नियोजन  केले गेले पाहिजे त्यासाठी व्यवसायाचे प्रशिक्षण घेणे किंवा संशोधन करून त्या विषयी संवाद करणे आवश्यक आहे. कृषी,व्यापार,उद्योग, . क्षेत्रात प्रगतीसाठी तांत्रिक गोष्टीची माहिती असणे गरजेचे असते. या गोष्टीची माहिती नसल्यास त्या गोष्टीचे प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे. हे प्रशिक्षण सर्वसामान्य शिक्षणापेक्षा वेगळे असते, आपल्या व्यवसायात उत्तम प्रकारचे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या कामगारांची निवड त्यांच्याकडे असलेल्या व्यावसायिक कौशल्यावर केली पाहिजे, व्यवसाय करताना लागणाऱ्या गुणवत्ता म्हणजेच क्षमता,ज्ञान,वृत्ती,कार्याव्यग्रता विश्लेषण शक्ती त्या कर्मचाऱ्यात असली पाहिजे अश्या सर्व गुणवत्ता असलेल्या कर्मचाऱ्याला उत्कृष्ट कर्मचारी असे संबोधले जाते, व्यवसायात व्यवस्थापक हा सर्वात महत्वाचा असतो तसेच व्यवस्थापकाचे  व्यवस्थापन करणे हे  अत्यंत महत्वाचे असते, त्याचबरोबर व्यवसायामध्ये उत्तम प्रकारचे काम करण्यासाठी पुढील काही गोष्टी  महत्वाच्या ठरतात. व्यवसाय वाढीसाठी प्रत्येक व्यावसायिक सर्व पध्दतीने प्रयत्न करत असतो, त्यामध्ये मुख्यतः बाजारातील स्पर्धा, मालाची गुणवत्ता, विक्री विक्री उत्तर सेवा व स्पर्धात्मक मालाची किंमत . घटकांवर व्यवसायाची वाढ आणि व्यवसायाचे वातावरण अवलंबून असते. व्यावसायिक विचार आणि वरील महत्वाच्या मुद्यांच्या रूपांतरावर व्यवसायाचे वातावरण स्थिरावते, त्यामुळे खालील मुद्द्याचा  व्यवस्थितरीत्या अभ्यास करून आपल्या व्यवसायाचे वातावरण सुधारण्याचे  प्रयत्न करता येतात.

व्यवसायातील मालाचे नियोजन –

व्यवसायातील मालाचे नियोजन व्यवस्थितरीत्या केले पाहिजे,नाही तर व्यवसायाचे वातावरण बिघडू शकतेमालाचे नियोजन करून पैशाची गुंतवणूक  विचारपूर्वक आणि व्यवस्थितरीत्या केली पाहिजे. कच्चा माल आणि फायनल फिनिश प्रॉडक्ट यांचे परिणामकारक नियोजन हेव्यवसायाचे अर्थशास्त्र” उत्तम राखणारे तत्व आहे. भांडवली मालाच्या खरेदीविक्रीनुसार त्याचे नियोजन केले पाहिजे. योग्य नियोजन केल्यामुळे अर्थ व्यवस्थापनात अडचणी येत नाही.

 व्यवसायातील  स्पर्धात्मक विचार –

व्यवसायात स्पर्धात्मक विचार केला पाहिजे जेणेकरून आपण गरजेनुसार आपला व्यवसाय वाढवू शकतो, त्या त्या काळानुसार बदल केले नाही तर त्याचा परिणाम व्यवसायावर होण्याची शक्यता असू शकते . स्पर्धात्मक विचार केला तर आपण जो व्यवसाय करतोय त्या प्रकारचा व्यवसाय करणारे आणि उत्पादित माल पुरवठा करणारे व्यावसायिक किती आहेत ? ते व्यावसायिक जो उत्पादित माल विक्रेता  त्याचा दर्जा, त्याची किंमत आणि  सेवा ही त्यांच्या पेक्षाही चांगल्या दर्जाचे आपण देऊ शकतो का? याचा अभ्यास करणे त्या अनुषंगाने व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेणे .

 मालाची गुणवत्ता वाढवा तणाव आणि कमी करा –

आपण जो माल बाजारपेठेत देणार आहोत त्यांची गुणवत्ता आणि किंमत यांचा स्पर्धात्मक अभ्यास आपण करून घेऊन मालाचा दर्जा आणि वस्तुचे मूल्य(किंमत) हे बाजारपेठेतील व्यवसायिकांना समजावून सांगण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे.आपल्या मालाचे विपणन करून त्यांची मार्केटिंग केली पाहिजे,आपला माल का ग्राहकांनी घ्यावा यांचे कारण आपल्याला सांगता आले पाहिजे. या सर्वांमुळे आपल्या मालाची देवाणघेवाण जास्त प्रमाणावर होते.आपल्या मालाची गुणवत्ता पडताळून ग्राहकांना खात्री दिली पाहिजे. गुणवतेच्या विश्वासावरच ग्राहक आपल्याकडे थांबतात.

 विक्री व विक्री पश्चात सेवा याकडे लक्ष दिले गेले पाहिजे –

सध्याच्या जागतिक व्यवसायिकरणात विक्री विक्रीत्वर सेवा ह्या विषयाला अनन्य साधारण महत्त्व आहे, आपण उत्पादित केलेला माल किंवा आपण बाजारपेठेत उपलब्ध करून दिलेला माल किंवा वस्तू .गोष्टींच्या विक्री पश्चात ग्राहकांना जर काही अडचण आली तर आपल्या व्यवस्थापनाकडून किंवा विक्री प्रतिनिधिकडून त्या ग्राहकांला तात्काळ सेवा पुरवता आली पाहिजे, बाजार पेठेतील आपले स्थान भक्कम होण्यास एक पर्याय तयार होतो.

दर्जा, मालाची किंमत आणि जागतिक बाजार पेठेतील स्पर्धा –

आताच्या नवीन ऑनलाईन विक्री सेवा तसेच, स्थानिक बाजारपेठेतील उत्पादित मालाची सेवा, दर्जा, किंमत . सर्व गोष्टींचा विचार करता ग्राहकाला आपल्याकडून उत्पादित माल हा वरील सर्व अनुषंगाने प्रभावित किंवा सोयीचा पडेल , अश्या पध्दतीने त्याचे आयोजन करून आपला माल स्थानिक  ते जागतिक बाजार पेठेत घेऊन जाता येतो.व्यवसायात एक पारदर्शक प्रतिमा निर्माण करून नियोजन केल्यास आपला व्यवसायाचे वातावरण व्यवस्थित राहते,अश्या बदलीकरणाचा भक्कम पाया विकसित करण्याचे काम व्यवस्थापकाकडे असते, त्यामुळे व्यवस्थापकांची कर्तव्य हे जास्त असतात. दिलेल्या सूचनांची व्यवस्थित पालन केल्यास आपल्या व्यवसायाचे वातावरण व्यवस्थित राहते.

   व्यवसाय यशस्वी होण्यासाठी ग्राहकांची गरज अचूकपणे ओळखुन त्यानुसार योग्य वस्तूची सेवा ग्राहकांपर्यंत पोचवणे आणि त्यामध्ये दखल देणे गरजेचे असते, उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी व्यवसायातील भविष्यकालीन बदल लक्षात घेऊन त्याचे नियोजन करावे लागते.कोणत्याही व्यवसायाची कार्यक्षमता ही उद्दिष्टांची निश्चिती , अनुरूप संघटनांची निवड, भांडवल इतर उत्पादक घटकांचा वापर, व्यवसाय स्थान निश्चिती, व्यवस्थापन कामगार यांच्यातील परस्परसंबंध ,यावर अवलंबून असते.व्यवसाय जर लहान असेल, तर व्यवसायाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी व्यवसाय प्रमुखालाच सांभाळावी लागते , परंतु व्यवसाय हा मोठा असेल तर व्यवसाय व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी स्वतंत्र विभाग असतो.व्यवसायात यश मिळवण्याच्या दृष्टीने एका व्यवसायिकाजवळ नेहमीच दुरदूरष्टी असली पाहिजे त्याच नुसार अचूक निर्णय क्षमता, व्यावसायिक निष्ठा नीतिमत्ता, या सर्व गुणांची आवश्यकता असते.

मधुरा जोशी

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”

 

Share this:

0 responses on "व्यावसायिक उत्तम वातावरण निर्मिती"

    Leave a Message

    Your email address will not be published. Required fields are marked *

    All Right Reserved.
    Translate »