विपणन व्यवस्थापन

 

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”

     

     सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या  युगात प्रत्येक उद्योगाची आर्थिक उद्दिष्टे, उत्पादनचे ध्येयं पूर्ण करण्यासाठी एका मजबूत वितरण व्यवस्थेची गरज आहे अगदी लक्ष देऊन योग्य वितरण व्यवस्थेचा वापर केला तर, उद्योगाची आर्थिक ध्येयं पूर्ण होऊ शकतील. फक्त थोडं वितरण व्यवस्थेबाबतीत सज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणजेच हातात असणारा पैसा कसा आणि किती खर्च करायचा, आपले उत्पादन ग्राहकापर्यंत किती वेगवान पद्धतीने पोहोचवावे, या सर्व घटकांचा विपणन व्यवस्थेत समावेश होतो.

      उद्योजकाला अवघड वाटणारी गोष्ट म्हणजे ग्राहकाला आकर्षित करणे, त्याला स्वतःची प्रॉडक्ट समजून सांगणे, ग्राहकाला टिकवून ठेवणे यासाठी त्यांनी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा हा प्रत्येक उद्योजकाला पडलेला प्रश्न असतो या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे “विपणन व्यवस्थापन” होय.

     उद्योजकाला प्रथमतः हे जाणून घेणे आवश्यक आहे ही आपले उत्पादन वापरणारा ग्राहक वर्ग नेमका कोणता आहे? तो कोणत्या भागात राहतो? ग्राहकाला आपल्या उत्पादनाची गरज आहे का? आणि आपले उत्पादन ग्राहकास आवडते आहे का? विपणनाची पारंपरिक संकल्पना ’उत्पादनाभिमुखी’ (Product Oriented) होती तर प्रगत संकल्पनेत ग्राहकांच्या गरजा केंद्रस्थानी (customer demand base) आहेत.विपणन व्यवस्था निर्माण करताना पुढील घटकांचा समावेश होतो.

 • विपणन व्यवस्थापन पद्धती

     आपण तयार करत असलेले उत्पादन देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करणार आहोत कि आंतरराष्ट्रीय स्तरावरती घेऊन जाणार आहोत. वितरणाची पद्धती ही आपण कोणत्या प्रकारची बाजारपेठ निवडतो त्यावरती  अवलंबून असते. विपणणाच्या पद्धती पुढील प्रमाणे :

 • एकात्मिक नियोजन :

     विपणन करण्याआधी ते का करायचे आहे? ते कोणत्या पद्धतीने करायचे आहे? कोणत्या ग्राहक वर्गासाठी करायचे आहे?  ते आधी निश्चित करून घ्यावे लागेल. या सर्वे घटकांचा विचार करून विपणणाची पद्धती निश्चित करावी लागते.

 • सामग्री विपणन :

         विपणन  करताना ते कोणत्या घटकाचे करायचे आहे हे लक्षात घेणे आवश्यक असल्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता, उत्पादनाची वैशिष्ठे, उत्पादनाचा ग्राहकास होणार उपयोग, उत्पादन मुळे ग्राहकास येणारी सुलभता या सर्वे घटकांचा विचार करावा लागतो.

 • संशोधन :

     विपणन करताना आपले स्पर्धक कोणकोणत्या घटकांचा विपणनासाठी उपयोग करतात? बाजारपेठेत कोणत्या प्रकारचे विपणन केले जाते? आपण कश्या प्रकारे विपणन करून ग्राहकास आकर्षित करू शकतो? या सर्व घटकाचे संशोधन करावे लागते.

 • जाहिरात :

        वितरण व्यवस्थेमध्ये जाहिरात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वपूर्ण माध्यम आहे यामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करतो यावरती आपल्या उत्पादनाची प्रसिद्धी आणि ग्राहक संख्या अवलंबून असते आपले उत्पादन सातत्यपूर्ण प्रयत्नांनी ग्राहकांच्या नजरेसमोर येत राहिले पाहिजे यासाठी तांत्रिक दृष्ट्या प्रगत आणि पारंपरिक जाहिरात साधनांचा वापर केला जातो  उदा.फेसबुक मार्केटिंग आणि पोस्टर मार्केटिंग.

 • डिजिटल मार्केटिंग :

       विपणन करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा वापर केला जातो. यामध्ये You tube, Facebook, Instagram, What App इ. घटकांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. तसेच सध्या बाजारपेठेत उद्योजक स्वतःची वेबसाइट तयार करून विपणन करतात.

 • मूल्यमापन :

आपण वापरत आसलेल्या विपणन पद्धतीचे वेळोवेळी मूल्यमापन करणे आवश्यक आहे. यावरून आपणास आपण वापरलेली विपणन पद्धती कितपण ग्राहकास आकर्षित करण्यास फायदेशीर ठरली आहे हे लक्षात येते

     

    “जो उदयोजक ग्राहकास टिकवून ठेवतो, तोच उदयोगात यशस्वी होतो.” 

Share this:
November 5, 2020

0 responses on "विपणन व्यवस्थापन"

  Leave a Message

  Your email address will not be published. Required fields are marked *

  All Right Reserved.
  Translate »