फेसबुक मार्केटप्लेस

फेसबुक मार्केटप्लेस

“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

फेसबुक हे जगातील सर्वात मोठे सामाजिक माध्यम आहे. जिथे आज १.६९ अब्ज लोक जोडले आहेत. जे आपल्या सर्व गोष्टी समाजासोबत सामाईक करतात. हे माध्यम याचकरीता तयार करण्यात आले होते पण बदलत्या काळाप्रमाणे यावर जसे-जसे लोक जुळत गेले तसे हे माध्यम व्यावसायिकांच्या उपयोगात येऊ लागले. कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्यावसाय पोहचविणे या माध्यमामुळे शक्य झाले आहे.

व्यावसायिकदृष्टया या माध्यमाचे आज खूप महत्व आहे. कारण यावर आलेले लोक हे तुमचे चांगले ग्राहक बनू शकतात फेसबुकने ही गोष्ट लक्षात घेता छोट्या व्यावसायिकांसाठी त्यांचे उत्पादन फेसबुक वर विकायची सोय करून दिली आहे ज्याला फेसबुक मार्केटप्लेस असे नाव दिले आहे.

ज्यामुळे तुम्ही तुमचे उत्पादन आता करोडो लोकांपर्यंत सहजरित्या पोहचवू शकता व त्यांना आपले ग्राहक बनवू शकता. चला तर मग आपण आज पाहूया की फेसबुक मार्केटप्लेस वर खाते कसे तयार करतात व आपले उत्पादन यावर कसे विकतात.

फेसबुक मार्केटप्लेस 01

फेसबुक मार्केटप्लेस वर खाते कसे तयार करायचे.

फेसबुक मार्केटप्लेस वर खाते तयार करण्यासाठी तुमचे फेसबुक चे खाते असणे आवश्यक आहे. आधी तुम्ही फेसबुक चे खाते तयार करून घ्या व नंतर फेसबुक मार्केटप्लेस चे खाते तयार करा. काळजी करू नका फेसबुक मार्केटप्लेस वर खाते तयार करणे व वापराने अगदी मोफत आहे याकरिता तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही आणि फेसबुक मार्केटप्लेस चा वापर करणे खूप सोपे आहे.

फेसबुक मार्केटप्लेस कसे वापरावे.

१) तुमचे फेसबुक उघडा जर तुम्ही मोबाइलवर फेसबुक अँप वापरत असाल तर ते अँप उघडा.हे अँप उघडल्या नंतर तुम्हाला उजव्या दिशेला 3 आडव्या रेश्या दिसेल त्यावर क्लीक करा. किंवा या लिंक वर क्लिक करून पण तुम्ही फेसबुक मार्केटप्लेस वर जाऊ शकता.
https://www.facebook.com/marketplace/learn-more

2) आता तुम्हाला खाली मार्केटप्लेस हे एका दुकानाच्या चिन्हांसोबत दिसेल बस तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे.

आता तुम्ही फेसबूक मार्केटप्लेस मधे पोहचले आहात जिथं तुम्ही तुंमचे उत्पादन विक्री करू शकता व काही खरेदीपण करू शकता.

3) तुमचे जे उत्पादन आहे त्याचे चांगले फोटो काढा हो फोटो काढून त्या फोटो मध्ये तुमच्या व्यवसायाचे चिन्ह टाका व ते फोटो यावर टाका व ते उत्पादन कोणते आहे ते लिहा.

एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या तुम्ही जिथं उत्पादनाचे नाव टाकता तिथेच तुमचा मोबाइल नंबर पण द्या व नंतर त्याची किंमत टाका नेहमी किंमत ही जेवढी आहे तेवढीच टाका कारण कमी किंमत टाकून लोक आकर्षित तर होतात पण नंतर ते तुमचे ग्राहक होत नाही.  

4) तुमचे उत्पादन हे कोणत्या श्रेणीत येते ती श्रेणी निवडा व नंतर ते उत्पादन तुम्हाला कोणत्या विभागात  विकायचे आहे तो विभाग निवडा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा विभाग निवडत असतांना जास्त मोठा विभाग निवडू नका कमीत कमी 30 किलोमीटर चा विभाग निवडा कारण जास्त मोठा विभाग निवडला तर तुमचे उत्पादन कमी ग्राहकांना दिसेल.

5) शेवटी तुम्हाला तुमच्या उत्पादनाविषयी माहिती द्यावी लागते तिथं तुमच्या उत्पादनाची संपूर्ण खरी माहिती द्या. जर तुम्ही तिथं चुकीची माहिती दिली तर ग्राहक पुन्हा तुमचे  उत्पादन किंवा सेवा घेणार नाही.एक गोष्ट लक्षात घ्या तिथं माहिती टाकत असतांना तुमचा मोबाइल नंबर नक्की द्या.

6) आता तुमचे उत्पादन पब्लिश करा.

फेसबुक मार्केटप्लेस चा वापर कोण करू शकतो.

तस तर फेसबुक मार्केटप्लेस चा वापर कुणी पण करू शकतो ज्याचे वय 18 वर्षाच्या वर आहे व त्याच्या कडे अँड्रॉइड मोबाइल आहे तो करू शकतो.

फेसबुक मार्केटप्लेस वर आपले उत्पादन विकत असताना ही काळजी घ्या.

 • आधी ही माहीती काढून घ्या की तुम्ही जे उत्पादन फेसबुक वर विकनार आहात ते विकण्यास फेसबुक परवानगी देते का.
 • तुम्हाला ग्राहकाने उत्पादन मागवल्या वर कधीच पैसे न घेता उत्पादन त्याला पाठवू नका.
 • कोणतेही उत्पादन तुम्ही तुमच्या ग्राहकाला पाठवले असता ते कधी त्याला मिळणार व ते कुठं पर्यंत पोहचले याची माहिती देत राहा.
 • तुम्ही जर पैसे हे ऑनलाईन माध्यमातून घेत असाल तर ते माध्यम सुरक्षित असेल याची खात्री करा.
 • ग्राहकाला तुमच्या सेवा व्यतिरिक्त दुसरे कोणते मेसेज करू नका.
 • तुमचे उत्पादन ग्राहकाला न आवडल्यास किंवा खराब निघाल्यास त्याच्या अटी आणि शर्ती ह्या आधीच ग्राहकाला सांगून द्या व त्याचा होकार घ्या.
 • तुमचे जे फेसबुक चे खाते आहे त्यावर तुमचा स्वतःचा फोटो ठेवा व तुमच्या बद्दल किंवा तुमचा कंपनी बद्दल संपूर्ण माहिती तिथे द्या कारण कोणताही ग्राहक फेसबुक मार्केटप्लेस वरून कोणतेही उत्पादन घेण्याआधी तुमचे मुख्य खाते तपासतो तिथे जर त्याला काही गडबड वाटली तर तो तुमच्याकडून उत्पादन विकत घेणार नाही. कारण तुमच्या खात्यावरून त्याला तुमच्या उत्पादनवर विश्वास निर्माण झाला नाही.

या प्रकारे तुम्ही फेसबुक मार्केटप्लेस वर तुमचे उत्पादन विक्री करू शकता व आपला व्यवसाय वाढवू शकता. आतापर्यंत मी तुम्हाला मोफत कसे तुमचे उत्पादन फेसबुक मार्केटप्लेस वर विकायचे हे सांगितले पण यामध्ये तुम्ही थोडे पैसे खर्च करून चांगल्या प्रकारे तुमचे उत्पादन जास्त ग्राहकांना विक्री करू शकता.

या पद्धतीने तुम्ही तुमचे उत्पादन अधिक चांगल्या प्रकारे जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवू शकता ते कसे आता आपण पाहू.

तुम्ही जे तुमचे उत्पादन फेसबुक मार्केटप्लेस वर टाकले आहे तिथेच तुम्हाला boost  म्हणून एक पर्याय येतो तो निवडा व त्यामध्ये विचारलेली माहिती द्या. त्यामध्ये तुम्हाला जास्त माहिती विचारली जात नाही फक्त तुम्हाला तुमचे जाहिरातीचे बजेट ठरवायचे आहे व किती दिवस ती जाहिरात चालवायची आहे हे टाकायचे आहे .

हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला पैसे भरावे लागतील ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन बँकिंग,डेबिट कार्ड किंवा paytm च्या साह्याने पैसे भरता येतात.

आता तुमची जाहिरात पूर्ण तयार झाली आहे आता तुम्ही ती जाहिरात पब्लिश करू शकता व तुमचे उत्पादन जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवू शकता.

आशा करतो तुम्हाला फेसबुक मार्केटप्लेस वर आपले उत्पादन कसे विकायचे ही माहिती नक्की समजली असेल काही अडचण आल्यास तुम्ही खाली कंमेंट करू शकता. अशाच माहितीसाठी चावडी ला भेट देत राहा.  

                                                                                                – धिरज तायडे

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”

Share this:

0 responses on "फेसबुक मार्केटप्लेस"

  Leave a Message

  Your email address will not be published. Required fields are marked *

  All Right Reserved.
  Translate »