नवीन उद्योगास बँक कर्ज घेण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट का लागतो ?

अनेक वेळा एखादा नवीन उद्योग सुरु करायचा असल्यास उद्योजक कर्ज मागणी साठी बँकेमध्ये चौकशी करतात…बँक व्यवस्थापक सर्व प्रथम प्रोजेक्ट रिपोर्ट (प्रकल्प अहवाल )घेवून या मग कर्ज देता येईल कि नाही ते बघू असे सांगतो. बऱ्याच नव उद्योजक ,शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आता हा प्रकार कुठे मिळणार? त्यात काय असते ?तो कशासाठी लागतो ई…
त्यामुळे खास आज चावडी च्या सर्व नवउद्योजक मित्रांसाठी  नक्की प्रोजेक्ट रिपोर्ट काय असतो तो कशासाठी लागतो याविषयी   माहिती देत आहे..
प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे खरतर तुमच्या उद्योगाचा खराखुरा लिखित चेहरा म्हणायला हवा…कारण यामध्ये खालील माहिती दिलेली असते किंवा ती देणे अपेक्षित आहे.

पहिला टप्पा :

तुमच्या उद्योगासाठी येणारा जो संपूर्ण खर्च आहे त्याचा एक प्रकारे ताळेबंद म्हणायला हवा …यामध्ये तुमच्या विषयी वयक्तिक माहिती, तुमचे शिक्षण ,त्या उद्योगाबाबत घेतलेले एखादे प्रशिक्षण तसेच तुमच्या कडील जागेची माहिती हि पहिल्या टप्प्यात असते .

दुसरा टप्पा :

तुम्ही जो उद्योग निवडला आहे त्या बद्दल सविस्तर माहिती जसेकी कच्चा माल किती लागणार ? तो कुठून येणार ? त्याला खरेदी साठी किती पैसे लागतील ? मग त्या साठी लागणारी मशीनरी ,त्यास लागणारी जागा ,त्याची उत्पादन प्रक्रिया , तयार झालेल्या मालाचे पाकेजिंग आणि महत्वाचे म्हणजे मार्केटिंग कसे होणार या सर्व बाबींची सविस्तर माहिती असेल.


तिसरा टप्पा :

या सर्व प्रोजेक्ट साठी तुम्हाला लागणाऱ्या भांडवल बाबत माहिती असेल ; ज्या मध्ये तुम्हाला जागेसाठी येणारा खर्च , बांधकाम करायचे असल्यास त्याचा खर्च , मशिनरी चा खर्च ,इलेक्ट्रिसिटी चा खर्च तसेच उद्योग सुरु करण्यापूर्वी लागणारे पूर्वीचे खर्च या कॅपिटल खर्चाच्या बाबी अंतर्भूत असतील तसेच मग खेळते भांडवल ज्या मध्ये कच्चा माल ,उत्पादन प्रक्रिया ,लेबर ,इतर खर्च लाईट ,पाणी,पेकेजिंग ,मार्केटिंग तसेच तुमचे प्रशासकीय खर्च असा सर्व खर्चाचा आरखडा एकत्रित केलेला असेल.

चौथा टप्पा

यामध्ये सर्व आर्थिक गणिते असतील जसेकी तुम्हाला मिळणारे उत्पन्न ,होणारा खर्च ,त्यातून राहणारा निव्वळ नफा ,बँक कर्ज ची परतफेड ई…
प्रोजेक्ट रिपोर्ट मधील गनितांनुसार जर हा प्रोजेक्ट योग्य रीतीने चालणार असेल असे दिसत असेल आणि तुम्ही बँक कर्ज घेवून हप्ते व्यवस्थित फेडून तुम्हाला सुद्धा पैसे शिल्लक राहत असतील असे चित्र असेल तरच बँक कर्ज देण्याबाबत सकारत्मक विचार करू शकते…
या वरील माहितीच्या आधारे बँक मग तुम्हास कर्ज द्यायचे कि नाही याबाबत निर्णय घेवू शकते. जर प्रोजेक्ट चुकीचा बनविला गेला तर थेट कर्ज सुद्धा नाकारले जावू शकते.त्या मुळे जाणकार व्यक्ती किंवा अनुभवी संस्था कडूनच प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून घ्यायला हवा…बाजारात अनेक ठिकाणी याबाबत नवोदितांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते.त्या मुळे सर्वांची गरज आणि मागणी लक्षात घेता गेल्या ७ वर्षापासून चावडी मध्ये  ५०० पेक्षा अधिक उद्योगांचे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिले जातात..
जर आपल्याला एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापुर्वीच सर्व नियम आणि अटी यांचे पालन करून बँक आणि शासकीय विभाग यांचा संगम करून मगच हा रिपोर्ट बनविला जाने आवश्यक आहे.
चला तर मग आज एक छोटासा प्रयत्न केला तुम्हाला वेगळी माहिती देण्याचा जर तुम्हाला सुद्धा एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा असेल तर चावडी तुम्हाला नक्की मदत करेल. त्यासाठी  खाली मोबाईल स्क्रीन वर दिसत असलेल्या ग्रीन पट्टीवर क्लिक करा.
Share this:
November 7, 2020

13 responses on "नवीन उद्योगास बँक कर्ज घेण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट का लागतो ?"

 1. माझं नाव सागर , मी माझं पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलय नोकरी करण्याचा विचार मनात नाहीये , मी उद्योग करण्यास इच्छुक आहे . मला माझं स्वतःचा साड्यांच दुकान उघडू इच्छितो तर त्यासाठी मला कर्ज कसं उपलब्ध होईल व इतर माहिती कशी मिळवता येईल

 2. प्रदिप दिक्षीतJanuary 21, 2018 at 4:03 amReply

  मी टॅक्स कन्सल्टंट असुन मजला प्रोजेक्ट रिपोर्ट संबंधित अधिक माहिती मिळावी व तो योग्य फॉरमॉट मध्ये असणे आवश्यक आहे तरी आपले जास्ती जास्त मार्गदर्शन मिळावे ही अपेक्षा आहे

 3. माला पोल्ट्री फॉर्म कोबड़ी साठी तयार karychi आहे तर सरकारी योजना किवा इतर माहिती असेल तर द्यावी मदत करा

 4. Santosh Sahebrao katheMarch 22, 2018 at 7:42 pmReply

  मला जे सी बी साठी प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे आहे मार्गदर्शन करावे

 5. बाबासाहेब शिवाजी कवडेMarch 22, 2018 at 8:56 pmReply

  सर मी रेशीम धागा निर्मीती ऊद्योग चालू करू ईच्छीत आहे.मला याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून हवा होता.मला आपन तो बनवून द्याल का?

 6. माला पोल्ट्री फॉर्म कोबड़ी साठी तयार karychi आहे तर सरकारी योजना किवा इतर माहिती असेल तर द्यावी मदत करा

 7. nandini umakant kubadeMarch 25, 2018 at 11:38 amReply

  मला काजु प्रक्रीया प्रोजेकट रिपोटँ बनवायचा आहे

 8. Sanjay Baburao KadsmMarch 31, 2018 at 5:33 pmReply

  सर मला काेबडि पालन करायचे आहे माहिति हवि

 9. Mla kukut paln karayche ahe tari mla yachi mahiti v bank karja vishai v सबसिडि vishi mahiti dyavi plz

 10. Balasaheb KandarphaleMay 3, 2018 at 9:39 amReply

  Sir mala seed clining plant lavayacha ahe mala help kara..

 11. उत्तम हापसेMay 5, 2018 at 11:55 amReply

  माझे नाव उत्तम हापसे
  राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मध्ये मी काम करतो .यामध्ये स्वयं रोजगार अंतर्गत शहरी गरीब गरजू लोकांना उपजीवीकेसाठी बँक लिंकेग करून त्यांना छोटे छोटे कर्ज उपलब्ध करून देणे हे माझे काम आहे .
  यासाठी वेगवेगळ्या उद्योग धंद्यासाठी प्रोजेक्ट प्रपोज़ल कसे बनवावे ? किंवा त्यासाठी एकात्मिक format करता येईल का ?
  याबद्दल क्रुपया मार्गदर्शन करावे

 12. Bharat Tatyaba NaleMay 5, 2018 at 3:14 pmReply

  I am Interested in the Drip Irrigation system
  Is Projecte Raporat is Avelebal

 13. Sir hotel business sathi aple margdarshan hawe ahe Detel mdhe milel ka

Leave a Message

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved.
Translate »