पोल्ट्री खाद्य निर्मिती – एक नियमित मागणी असणारा उद्योग (poultry Feed manufacturing)

 पोल्ट्री खाद्य निर्मिती – एक नियमित मागणी असणारा उद्योग (poultry Feed manufacturing)

पोल्ट्री खाद्य निर्मिती

पोल्ट्री व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या ७० टक्के खर्च हा फक्त खाद्यावर होतो. कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण खाद्यापैकी ३५ ते ४५ टक्के खाद्याचे रूपांतर हे अंडी व मांसामध्ये होते.

कोंबड्यांच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. कडधान्यांमध्ये सुमारे आठ ते १२ टक्के आणि द्विदल धान्यांमध्ये ३० ते ४० टक्के प्रथिने असतात. कोंबडीखाद्यामध्ये वनस्पतिजन्य प्रथिने आणि प्राणिजन्य प्रथिनांचा समावेश करावा.

ज्वारी, गहू, मका, तांदूळ इ. धान्यांत पिष्टमय पदार्थ भरपूर असतात. हे घटक आहारात असावेत.

कोंबड्यांच्या वाढीसाठी स्निग्ध पदार्थांची आवश्‍यकता असते.

हे पदार्थ अन्न तुटवड्याच्या कालावधीमध्ये शरीरास उष्णता व कार्यशक्ती पुरवितात. स्निग्ध पदार्थांमुळे खाद्याला चांगली चव येते. सर्व प्रकारचे खाद्यतेल व चरबी यांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात.

हाडांची बळकटी आणि अन्नपचनासाठी कोंबड्यांना खनिजांची आवश्‍यकता असते.

कोंबड्यांच्या आहारात खनिजांचा वापर योग्य प्रमाणात केल्यास पायातील अशक्तपणा दूर होतो. हाडांची योग्य पद्धतीने वाढ होते, त्यांना बळकटी मिळते.

शरीरास कॅल्शिअम, लोह, मीठ, फॉस्फरस, आयोडीन, तांबे, सोडिअम, पोटॅशिअम, सेलेनिअम, मॅग्नेशिअम, मॅंगेनिज, झिंक इत्यादी खनिजांची आवश्‍यकता असते.

जीवनसत्त्वांमुळे कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते, उत्पादन वाढते. शरीर कार्यक्षम व तजेलदार राहण्यासाठी जीवनसत्त्वांचा उपयोग होतो.

पोल्ट्री खाद्य निर्मिती साठी इन्व्हेस्टमेंट :
मशिनरी साठी साधारण १०-१२ लाख खर्च अपेक्षित आहे .पण कच्चा माल खरेदी करण्यासाठी तसेच इतर आवश्यक मटेरियल साठी सुद्धा खर्च येईल.
शासकीय योजना आणि बँक कर्ज विषयक :
तुमची पत पाहून बँक तुम्हाला बँक कर्ज उपलब्ध होवू शकेल. तसेच शासनातर्फे प्रोत्साहनपर योजना सुद्धा उपलब्ध आहे.साधारण २५ % अनुदान मिळते.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

अधिक माहिती साठी

खाली दिसत असलेल्या Call Now या ग्रीन रंगाच्या बटन वर क्लिक करा

Share this:
November 7, 2020

2 responses on "पोल्ट्री खाद्य निर्मिती - एक नियमित मागणी असणारा उद्योग (poultry Feed manufacturing)"

  1. Interested

Leave a Message

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved.
Translate »