नाराळापासून तयार करता येणारी उत्पादने…!!!!

नाराळापासून  उत्पादने …!!!!
नाराळाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होत असल्याने त्याला कल्पवृक्ष असे म्हणतात. कल्पवऋक्षाच्या विविध भागावर प्रक्रिया केल्यावर खोबरे, डेसिकेटेड, खोबरे, नारळ मलई दूध ऍक्टिव्हेटेड कार्बन अशी व्यापरी मूल्य असणारी उत्पादने आपणासं तयार करता येतात. या उत्पादनातून निश्चित लघु उद्योगा उभारता येते. अनेक ठिकाणी आपणांस नारळ्याची झाडे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यापासून आपल्याला चांगले प्रकारे विविध उत्पादने तयार करता येतात. नारळापासून कोणकोणत्या प्रकारची उत्पादने तयार केली जातात. याची माहिती पुढील प्रमाणे आपणास दिसून येतात.

१.      खोबरे  :-

नारळ ११ ते १२ महिन्यांचे पक्व झाल्यानंतर ते खोबरे तयार करण्यासाठी वापरतात. ताज्या खोबऱ्यात ५० ते ५५ टक्के तसेच वाळलेल्या खोबऱ्यामध्ये पाच ते सहा टक्के पाणी असते. नारळ फोडून वाट्या उन्हामध्ये सात ते आठ दिवस वाळवाव्यात. खोबरे वाळविण्यासाठी सौर वाळवणी यंत्राचा वापर करता येतो.

२.      नारळाचे दूध आणि दुधाचे पदार्थ  :-

पक्व नारळाच्या खोबऱ्यापासून दूध तयार करतात. डेअरी क्रीमला पर्याय म्हणून यांचा वापर होतो. गाईच्या दुधाच्या तुलनेत यात स्निग्धांश भरपूर असतात, परंतु प्रोटिन, साखर कमी असते.

३.      नारळ मलई  :-

नारळाच्या दुधापासून घट्ट मलई तयार केली जाते. वेगवेगळ्या करी, गोड पदार्थ, पुडिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो, तसेच बेकरीचे पदार्थ तयार करण्यासाठीही याचा वापर केला जातो.

४.      नारळातील पाणी :-

या पाण्यात दोन टक्के साखर, ५.४ टक्के एकूण विद्राव्य घटक, ०.५  टक्का खनिजे, ०.१  टक्का प्रोटिन आणि ०.१ टक्का स्निग्धांश असतात. या पाण्यापासून व्हिनेगार तयार केले जाते.

[huge_it_slider id=”2″]

५.      शहाळ्याचे पाणी  :-

शहाळ्याच्या पाण्यात सर्वांत जास्त पालाश आणि खनिजे असतात. सात महिन्यांच्या शहाळ्याच्या पाण्यात साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते. “चौघाट ऑरेंज ड्‌वार्फ’ ही नारळाची जात शहाळ्याच्या पाण्यासाठी उत्कृष्ट आहे. अनेक आजारांत शहाळ्याचे पाणी रुग्णाला दिले जाते. विशेषतः हगवण, जुलाब, उलटी व पोटाचे विकार यांत मोठ्या प्रमाणात ते वापरले जाते.

६.      खोबरेल तेल  :-

सुक्‍या खोबऱ्यापासून ६५ ते ७० टक्के (सरासरी ६०.५ टक्के) खोबरेल तेल मिळते. भारतामध्ये तेलाचा उपयोग खाण्यासाठी – ४० टक्के, स्वच्छतागृह साफ करणारे पदार्थ/ सौंदर्यप्रसाधने –  ४६ टक्के, साबण तयार करणे – १४  टक्के एवढा केला जातो.

७. करवंटी :-
देशात अंदाजे १.७ दशलक्ष टन करवंटी दर वर्षी उपलब्ध होते. करवंटीपासून कोळसा, ऍक्‍टिव्हेटेड कार्बन, करवंटी भुकटी, भांडी, शोभेच्या वस्तू, आइस्क्रीम कप, बटण अशी विविध उत्पादने तयार केली जातात.

८. करवंटी कोळसा :-
करवंटीपासून ३० टक्के म्हणजेच १००० करवंट्यांपासून ३० किलो, तर ३०,००० करवंट्यांपासून एक टन कोळसा मिळतो.

९.      करवंटीची भुकटी :-

स्वच्छ करवंटी दळून त्याची भुकटी तयार करतात. तिचा उपयोग लाकडाच्या भुश्‍शाऐवजी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक, बकेलाइट कारखान्यात, फिलर म्हणून मच्छर अगरबत्ती आणि इतर अगरबत्ती, फिनॉलीन पावडरमध्ये आणि प्लायवूड लॅमिनेटेड बोर्डात वापरली जाते.

वरील प्रकाराची नाराळापासून उत्पादने आपल्याला नाराळ्याच्या झाडापासून घेता येतात.  हि उत्पादने तयार केल्यास  आपणांस चांगला फायदा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी :- 7249856424

November 9, 2020

0 responses on "नाराळापासून तयार करता येणारी उत्पादने…!!!!"

Leave a Message

All Right Reserved.