उद्योगातील आव्हाने

 

 

“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

              उद्योगातील आव्हाने

     व्यवसाय किंवा उद्योग करत असताना आपल्यातील प्रत्येक व्यावसाईक उद्योजकास परिस्थितिजन्य अडचणींना सामोरे जावे लागते. ह्याला उद्योगातील आव्हाने असे म्हणतात. जसे की उद्योगात येणाऱ्या अडचणी आणि परिस्थितिजन्य बदल यामुळे होणार उत्पादनावरील परिणाम.

     समोर येणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार करून आवश्यक ते बदल करणे आणि आत्मविश्वासाने व्यावसायाची सातत्यपूर्ण प्रगती राखत व्यवसाय बळकट करणे या धोरणांचा अवलंब करून उद्योगातील आव्हाने संपुष्ठात आणता येतात.

उद्योगातील आव्हाने पुढील प्रमाणे :

 

नैसर्गिक आपत्ती :

    अतिवृष्टी, वादळ, संततधार पाऊस या कारणामुळे उद्योगपूरक कच्चामालचे उत्पादन आणि उपलब्धतेवर परिणाम होऊन मागणी आणि पुरवठा विस्कळीत होऊन उत्पादनाच्या अंतिम किंमतीवर परिणाम होतो ,

     जागतिक संसर्गजन्यरोग जसे की कोरोंना विषाणू (Covid-19) या साथीच्या रोगामुळे त्रस्त आहेत. या परिस्थितीमुळे कमी होणारे उत्पादन आणि घटती कामगारांची संख्या. याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे आणि जागतिक विकास दर घासरत आहे.  भारतातील कोरोंना विषाणू (Covid-19) साथीच्या रोगामुळे झालेले आर्थिक परिणाम भारत सरकार सांख्यिकी मंत्रालयाने स्पष्ट केले आहेत. सन २०१९-२०२० च्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत भारताचा विकास दर घसरून 3.१ टक्क्यांवर गेला आणि जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार सध्याच्या साथीच्या रोगाने “भारताच्या आर्थिक जोखमींमध्ये वाढ केली आहे.”

(Source : Wikipedia)

मानवनिर्मित आपत्ती:

     मानवनिर्मित आपत्ती म्हणजे कुशल/ अकुशल कामगारांचा मर्यादित पुरवठा, कुशल कामगार निर्मिती मधील प्रशिक्षण समस्या, स्पर्धकामुळे होणार किंमतीवरील परिणाम, कामगार संप, ताळेबंदी, दिवसेंदिवस जागतिक बळकट स्पर्धकांची वाढती संख्या अश्या मानवनिर्मित समस्या प्रकर्षाने जाणवत आहेत

 

तांत्रिक आव्हाने:

     देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय होणारे धोरणात्मक बदल, उद्योगाकाला काळानुरूप बदलावी लागणारी उत्पादन प्रक्रिया, बदलते प्रगत तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे होणारा अधिकचा खर्च, यंत्रसामग्रीतील विकाशीत तंत्रज्ञानावर होणारा अधिकचा खर्च, या समस्याना उद्योजकला सामोरे जावे लागत आहे.

 

आर्थिक आव्हाने :

     देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्थरावरील उत्पादनातील फरक, आयात निर्यात धोरणांचा उत्पादन शुल्कावर होणार परिणाम. शासनाची बदलती धोरणे जसे की जी.एस.टी. आणि नोटाबंदी अश्या घटकांचा उत्पादन खर्चावर होणारा बदल दिसून येतो.

     बँकांतिल धोरणांचे बदलते सूत्र आणि पतपूरवठयावर  होणारा परिणाम उदा. १ ) रेपो रेट आणि महागाई दर  २) आंतरराष्ट्रीय चालनाचे वाढते दर.

 

बाजारपेठंतील आव्हाने:

    बाजारपेठ निवडतांना येणाऱ्या समस्या, वाहतुकितील तांत्रिक समस्या, बाजारपेठ आणि उत्पादन केंद्र यांच्यातील अंतर, बाजारपेठेतील मक्तेदारी, वाढता वाहतूक खर्च, अश्या समस्या नियमित भेडसावत आहेत.

     वरील सर्वे घटकांचा कच्चामाल व उत्पादन प्रक्रिया, विपणन आणि उद्योजकास होणार नफा किंवा  तोटा यांचा घनिष्ट संबंध असल्यामुळे व्यवसायात येणारी आव्हाने कुशलतेने हाताळणे आवश्यक आहे. यासाठी सर्व गोष्टींचा सखोलतेने अभ्यास करणारा उद्योजकच यशस्वी होतो.

 

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”

Share this:
November 5, 2020

0 responses on "उद्योगातील आव्हाने"

    Leave a Message

    Your email address will not be published. Required fields are marked *

    All Right Reserved.
    Translate »