• No products in the cart.

आवळा प्रक्रिया उद्योग ………!  

आवळा प्रक्रिया उद्योग ………!
सर्वांच्याच माहितीचे असणारे हे औषधी फळ आहे. आवळ्याचे बरेसचे औषधी उपयोग आहेत हे मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत आलेले ज्ञान बऱ्याच जणांना माहीत असते. आवळ्यामध्ये फार मोठ प्रतिकार शक्ती आहे. आवळ्या मध्ये इतर कोणत्याही फळांपेक्षा आवळ्या मध्ये ‘क’ जीवनसत्व सर्वांत जास्त असते. आवळ्याच्या बऱ्याचशा सुधारीत जाती विकसित झाल्या आहेत. पोटदुखी किंवा पित्ताच्या त्रासावर आवळ्याचा वापर आपल्या देशात परंपरागतरित्या केला जातो. आवळ्याचे आंबट, तुरट असणारे फळ आपण सर्वांनीच खाल्लेला आहे. तसेच त्यापासून आपणांस विविध पदार्थ तयार केले जातात.
उद्योग :-
हिवाळ्यामध्ये प्रमुख्याने आवळ्याचे पिक येते. हिवाळा हा आवळा उत्पादनाचा सिझन असतो. वर्षभर आवळ्याचे उत्पादन मिळत नसल्याने आवळ्या पासुन प्रक्रिया केलेल्या पदार्थ व उत्पादनांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. आवळा पासुन प्रक्रिया केलेल्या पदार्थ व उत्पादनांना आज बाजारपेठेत मोठी  मागणी आहे. आवळा सुपारी तर आपणा सर्वांनाच माहित आहे. प्रवासाला जाताना किंवा प्रवासात उलटी येऊ नये म्हणून किंवा तोंडाला मळमळ वाटत असेल तर बऱ्याच वेळा आवळा सुपारी खाल्ली जाते. बसमध्ये रेल्वेमध्ये आवळा सुपारी बरेचसे विक्रेते विक्रीसाठी घेवून येतात. आवळ्यापासुन आवळा सुपारी, आवळा, आवळा लोणचे, मुरांबा, आवळा काँडी, आवळा चिक्की असे बरेचसे पदार्थ बनवले जातात. त्याला बाजारात मागणीही आहे. केशवर्धक तेलांमध्ये औषधी गुणधर्म असलेल्या आवळ्याचा उपयोग होतो. कमी खर्चात व जास्त मागणी असणारे आवळ्यापासून बनविले जाणारे उत्पादन म्हणजे आवळा सुपारी बनविणे करिता. आवळ्याचे फळ हाच मुख्य कच्चा माल लागतो. याकरिता सुधारित जाती एन-६, एन-१० कांचन, कृष्णा, बनारसी या जाती आहेत. रोखीचे पीक म्हणून बरचशे शेतकरी आवळ्याची लागवड करतात. स्थानिकच्या आवळा शेतकऱ्यांकडून आवळ्या हा शेतकऱ्या कडून खरेदी करावीत.

बाजारपेठ :-
आवळ्याच्या फळांपासुन तुम्ही आवळा सुपारी तयार केली जाते. नंतर त्याचे पॅकिंग तुम्ही आकर्षक वेष्टनात करावे. बाजारपेठेत असणारे इतर आवळा उत्पादकांची उत्पादने व त्याचीं पॅकिंग याचा अभ्यास करावा. इतरांच्या पेक्षा वेगळे व आकर्षक असे तुमचे पॅकिंग असावे. उत्पादनाच्या खर्च विक्री व नफा प्रमाण यांची सांगड घालुन बाजाराच्या मागणीप्रमाणे लहान मोठी पॅकिंग करावीत. आवळा सुपारीची मागणी सर्वत्र आहे. लहान पानटपरी दुकाने, किराणा दुकान, रेल्वे, बस या ठिकाणी असणारे किरकोळ विक्रेते, हर्बल उत्पादने विक्री करणारी दुकाने हे तुमचे मुख्य ग्राहक असतात. या ठिकाणी जाऊ सुध्दा आपल्या मालची विक्री करता येईल. तसेच डोअर मार्केटिंग, सेल्समना मार्फत सुध्दा मालाची विक्री करता येते.
प्रकल्पविषय :-
या आवळा प्रक्रिया  उद्योग उभारणीसाठी साधारण १.५० ते २ लाख रूपये खर्च येतो. उद्योग सुरु झाल्यावर खर्च कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. तसेच बॅंक सुध्दा आपली पत पाहून कर्ज पुरवठा करतो. हा प्रक्रिया उद्योग सुरु झाल्यावर आपणांस चांगला नफा मिळू शकतो.
अधिक माहितीसाठी :- 7249856424

November 9, 2020

0 responses on "आवळा प्रक्रिया उद्योग ………!  "

Leave a Message

All Right Reserved.