आर्थिक मंदी की उद्योजकांना संधी ?

“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

      “स्वतःच्या उद्योगाची मजबूत उभारणी करताना उद्योजकांना नेहमीच उत्पादन क्षमता, आर्थिक व्यवस्थापन, व्यावसाईक प्रगती आणि आयात निर्यात व्यापार धोरणे यांचा विचार करावा लागतो.” उद्योजकाच्या डोक्यातील नेहमीच्याच असलेल्या अनेक प्रश्नाच्या गर्दीतील एक नेहमीचा  प्रश्न म्हणजे “अर्थव्यवस्था”

     अर्थव्यवस्था ही जगाची, भारताची तशीच स्वतःच्या व्यावसायाची सुद्धा असते, अर्थव्यवस्थेतेच्या मंदीवर मात करून आपण आपल्या कुटुंबाला, गावाला, राज्याला, देशाला मंदीपासून वाचवण्यासाठी आपला स्वतःचा उद्योग करणे आवश्यक आहे, नाही का ?

     आर्थिक मंदी आणि जागतिक व्यापार युद्ध  यांचा अभ्यास करून  स्वतःच्या उद्योगावर लक्ष केंद्रीत करत व्यवसाय जास्तीत जास्त प्रमाणात वाढवने हा विकसित उद्योगाचा पाया आहे. सामान्यतः “आर्थिक मंदी ” म्हणजे काय? आणि ती कशामुळे उदभवते? हे समजून घेणे गरजेचं आहे

     आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तू व सेवांच्या उत्पन्नात सातत्याने घट होणे आणि एकूण देशांतर्गत उत्पादनात कमीत कमी तीन महिन्यापर्यंत घट होत जाणे, या अर्थव्यवस्थेच्या अस्थिर कालावधीत सामान्य आर्थिक क्रियाकलपातील घट किंवा व्यावसाय चक्रातील सकुंचन होणे याला  अर्थव्यवस्थेतील “आर्थिक मंदी” म्हणतात.

आर्थिक मंदीची कारणे :

     रोजगार दारात होणारी घट, गुंतवणूक आणि व्यावसायातील नफा एकाच वेळी कमी होणे तसेच भांडवलाची आणि व्यावसायाची व्यवस्थितरित्या विपणन न होणे, मालाची देवाण-घेवाण कमी होणे, व्यापार थांबणे, बांधकामे थांबणे, भांडवल योग्य दारात न मिळणे, महागाईचा वाढता दर,  अंतिम वापरकर्ते (ग्राहक) यांचे घटते दरडोई उत्पन्न  अशी अनेक कारणे आहेत.  तसेच आर्थिक मंदीच्या कारणांमध्ये आयात निर्यात, उत्पादित मालाची वितरण व्यवस्था, बाजार मागणीचा घटता दर, मागणी व पुरवठ्यामधील तफावत, अनियमित वाहतूक व्यवस्था, उत्पादन वितरणामधील अडचणी इ. बाबी आर्थिक मंदी येण्यास कारणीभूत असतात. विशेषतः मंदीच्या काळात उत्पादनक्षमता, रोजगार, गुंतवणूक, घरगुती उत्पन्न आणि व्यावसायाचा नफा हे सर्व मंदीच्या काळात कमी होते आणि त्यामुळे व्यवसाय चक्र सकुंचन पावते आणि आर्थिक मंदी होते. जागतिक आणि देशांतर्गत विकास दर  (जीडीपी)  घटत जातो आणि  परिणामतः आर्थिक मंदी होते.

उपाययोजना :

     वित्त पुरवठा वाढविणे आणि कर कमी करणे, यासारख्या व्यापक आर्थिक धोरणाचा अवलंब करून सरकार आणि अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत आहेत.  आर्थिक विकासाला हातभार लावणारे घटक म्हणजे प्रामुख्याने ऊर्जा, कर्जपुरवठा, वाहतूक व दळणवळण सुविधा, बँक व विमा सुविधा, शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या अनेक सुविधा आणि कच्चा मालावर प्रक्रिया करणारे उद्योग यांचा समावेश होतो. यामुळे आर्थिक क्षेत्रात उत्पादन वाढ होते, व्यावसाय विस्तारतात , अनेक रोजगाराच्या संधी  निर्माण होतात आणि त्यामुळे उत्पन्न वाढते, बचत वाढते, गुंतवणूक वाढते. व्यावसाईकांना संधी भेटतात वित्त पुरवठा वेगाने वाढतो . आर्थिक व्यवस्था स्थिरावते आणि शांतता व सुव्यवस्था निर्माण होते. अर्थव्यवस्थेमध्ये बदल करू पाहणाऱ्या  वाहतूक, आर्थिक व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, औद्योगिक विकास, व्यापार,शेती, रोजगार, तंत्रज्ञान, पर्यटन या घटकांचा अभ्यास करून यशस्वी उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल करणे आज महत्वाचे आहे.

व्यावसायाचे बदलते विपणन :

      सध्याच्या Covid-19 च्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षानुवर्षे नोकरी करत असलेल्या अनेक सहकारी आणि कर्मचाऱ्यांची नोकरी गेली असल्याने, अनेकांना आज स्वतःच्या उद्योगाचे असलेले महत्त्व  कळालेच आहे , सध्याच्या असलेल्या या आर्थिक मंदीतही अनेक व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना  नव्याने त्यांचा  व्यापार आणि उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची संधी सापडली  आहे. विपणन करून आपण आपल्या व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवू शकतो. आपल्या व्यवसायाची विविध सोशल मीडियाद्वारे किंवा विविध उपक्रमाद्वारे नवं नवीन साहित्यिक संदेश देऊन आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करून ग्राहकांना आकर्षित करणे आवश्यक आहे.  पारंपरिक जाहिरात स्वरूपात अथवा डिजिटल माध्यमातून  कमी खर्चिक  मार्केटिंग पद्धती विकसित करून जाहिरात  करणे अत्यावश्यक आहे .

विविध व्यावसाय क्षेत्र आणि नियोजित संधी :

     आपल्याला अनेक उद्योग क्षेत्र जसे की कृषी, लघु आणि माध्यम प्रक्रिया उद्योग , गृह आणि कुटीर उद्योग इ. क्षेत्रात जोमाने काम करण्याची संधी नव्याने उपलब्ध झाली आहे.  आपला व्यापार आणि उद्योग हा आपण घरी बसून ही आज ऑनलाईन पद्धतीने अनेक प्रकारे विविध सोशल माध्यमाचा वापर करून आपल्या व्यापाराची विपणन करू शकतो. कोणतेही क्षेत्र असो  त्यात अनेक संधी आहेत,  अनेक छोट्या मोठ्या उद्योगाचे जसे की घर बांधणी, वाहन उद्योग, कृषी क्षेत्र, कापड उद्योग, अश्या अनेक उद्योगाचे समीकरण नव्याने स्थापित करून आपण त्यात आव्हानात्मक संकल्पनाचा विचार करून उद्योग करू शकतो. सरकारने विविध क्षेत्रात नवीन योजना (स्टार्टअप प्लॅन) जाहीर केल्या आहेत, त्यामध्ये विविध उद्योगांना लागणारे छोटे,  मध्यम कर्ज, खाते बी-बियाणे, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव, शेतीसह विविध उद्योगांना लागणाऱ्या सवलती अश्या अनेक सवलती सरकारच्या स्टार्टअप प्लॅनमध्ये असून त्याचा अभ्यास करून आपण आर्थिक मंदीच्या काळातही नवनवीन उद्योगाच्या संधी साधून आपण आपला व्यवसाय सुरू करू शकतो.  व्यवसाय सुरू करताना आपल्याला आधीच त्या व्यवसायाचा आराखडा काढून त्यानुसार काम केले पाहिजे , जसे  कोणता व्यवसाय कोणत्या ठिकाणी केला पाहिजे, त्यासाठी आपल्याला लागणारा कच्चा माल कुठल्या ठिकाणी कमी भावात मिळेल , भांडवलाची जास्त गरज कोठे आहे या अनेक गोष्टींचा विचार करून आपल्या नियोजित उद्योगाला सुरवात करून यशस्वी  वाटचाल करता येते.

     “केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे” या युक्तीनुसार आर्थिक मंदीमध्ये सुद्धा आपण संधी साधू शकतो.

– मधुरा जोशी

“व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”

Share this:
November 5, 2020

0 responses on "आर्थिक मंदी की उद्योजकांना संधी ?"

    Leave a Message

    Your email address will not be published. Required fields are marked *

    All Right Reserved.
    Translate »